गुन्हे विषयक
चोरीचा प्रयत्नात असलेला संशयित चोरटा जेरबंद,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव पोलिसांनी गस्त वाढलेली असताना ब्राम्हणगाव परिसरात आरोपी दिपक उर्फ गंग्या संजय जाधव (वय-२३) रा.अंबिकानगर ब्राम्हणगाव हा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांना मिळून आल्याने त्यांनी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केल्याने ब्राम्हणगाव सह परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात अवैध व्यावसायिकांनी आपल्या मोठया प्रमाणावर पथाऱ्या पसरल्या असून याबाबत पोलीस अधिकारी आगामी गणोशोत्सव लक्षात घेऊन सतर्क झाले आहे.त्यामुळे त्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या नूसार त्यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी एक पथक स्थापन करून त्यात विविध पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना समाविष्ट करून चोरट्यांना धाक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान अशातच एक पथक आज पहाटे दि.२३ सप्टेबर रोजी पहाटे ०१ वाजेच्या सुमारास ब्राम्हणगाव येथील गस्ती पथावर असताना त्यांना साईच्छा जनरल स्टोअर जवळ बोळीत एक संशियत इसम आपली ओळख लपवून काही गुन्हा करण्याचे उद्देशाने मिळून आला आहे.त्यास तालुका पोलिसांनी पाहिले असता त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहे.त्यावरून पोलिसानी त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अमोल सुराजी फटांगरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व पोलीस नाईक काळे यांनी भेट दिली आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा अनुक्रमे क्रं.४६०/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार ए.एम.आंधळे हे करत आहेत.