गुन्हे विषयक
लाकडी दांड्याने मारहाण,कोपरगावात दोघांविरुद्ध गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील रहिवासी असलेले फिर्यादीचा मुलगा प्रशांत दादा मेहरखांब याने गावातील आरोपी सोमनाथ छगन वाहूळ याचे घरासमोर रस्त्यावर जाऊन त्यास लहान भाऊ,वयोवृद्ध आई-वडील व पत्नीस शिवीगाळ का केली ? याचा जाब विचारण्यास गेला असता आरोपी सोमनाथ वाहूळ व अमोल छगन वाहूळ आदींनी त्यास लाकडी दांडा,फावडे,काहीतरी विषारी औषधांचा फवारा आदींच्या सहाय्याने फिर्यादीच्या मुलगा प्रशांत मेहेरखांब यांस जबर मारहाण केली असून वाईट साईट शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे सांगवीभुसार आणि परीसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत फिर्यादी दादा सखाराम मेहेरखांब (वय-७३) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटलं आहे की,”आपण सांगवी भुसार येथील रहिवासी असून आपला मुलगा प्रशांत मेहरखांब व वरील दोन आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद आहेत.दि.०९ सप्टेंबर रोजी सकाळी ०७ वाजेच्या दरम्यान आपला मुलगा प्रशांत मेहरखांब हा आरोपी सोमनाथ वाहूळ याचे घरासमोर गेला असता त्याने सोमनाथ वाहूळ यास,’तू,माझ्या लहान भावास व आई वडील आणि आपल्या पत्नीस शिवीगाळ का केली ? अशी विचारणा केली असता त्यास त्याचा राग आला व त्याने आपल्या मुलास वाईट साईट शिवीगाळ केली.त्याने त्याच्या हातातील लाकडी दांडा व फावड्याने फिर्यादीचा मुलगा प्रशांत मेहेरखांब,पुंडलिक सखाराम मेहेरखांब,तसेच दत्तात्रय दादा मेहेरखांब,यांचे तोंडावर काही तरी अज्ञात विषारी औषधांचा फवारा मारला असून आरोपी अमोल वाहूळ याने वाईट साईट शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे.व “परत आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही” असे म्हणून दमदाटी केली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस हे.कॉ. संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४३८/२०२३ भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संदीप बोटे हे करत आहेत.