गुन्हे विषयक
चोरीचा गुन्हा दाखल,कोपरगाव बस स्थानकातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात एक प्रवासी महिला उभी असताना तिच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरून नेले असल्याचा गुन्हा ताजा असताना आज पुन्हा एक गुन्हा दाखल झाला असून त्यात खुलताबाद तालुक्यातील एक प्रवासी महिला मिनाबाई कारभारी होळकर (वय-५५) यांचे एक ४५ हजार किमतीचे सोन्याचे डोरले व पोत,मणी मंगळसूत्र त्यांच्या बॅगमधून चोरून नेल्याने आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

खुलताबाद तालुक्यातील ममनापूर जिल्हा संभाजीनगर येथील येथील प्रवासी महिला कोपरगाव बस स्थानकावर उभी असताना त्यांचे जुने वापरते ४५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले,सोन्याची पोत असा ऐवज लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅग मधून लंपास केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे आणि चोरट्यांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शहरातील चिंता वाढली आहे.राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात एक प्रवासी महिला उभी असताना तिच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरून नेले असल्याचा गुन्हा ताजा असताना आज पुन्हा एकदा चोरट्यांची वक्र दृष्टी प्रवाशांवर पडली असून त्यात खुलताबाद तालुक्यातील काटेश्वरी फाटा ममनापूर जिल्हा संभाजीनगर येथील येथील प्रवासी महिलेला त्याचा फटका बसला आहे.त्यात त्यांचे जुने वापरते ४५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले,सोन्याची पोत असा ऐवज लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅग मधून लंपास केला आहे.
दरम्यान सदर बाबत त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदार ठोंबरे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं.४२८/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करत आहेत.