विशेष दिन
व्यसनातून बाहेर पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी-पोलीस निरीक्षक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
व्यसनी व्यक्तींच्या मदतीसाठी विविध ठिकाणी जरी व्यसन मुक्ती केंद्र असले तरी यातून बाहेर पडण्याचे प्रमाण दहा टक्के इतकेच नगण्य आहे.त्यामुळे याची चव देखील चाखू नका असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी नुकतेच सुरेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
भारतात नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट १९८५ (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे.मालद्वीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन १९६१ झाले.दुसरे संमेलन १९७१ मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले.गैरकानुनी धंद्याच्या विरोधात १९८८ मध्ये तिसरे संमेलन झाले.या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन,वितरण,सेवन,विक्री,वाहतूक,साठा,वापर,आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे.
संयुक्त राष्ट्राने सन-१९८७ पासून अमली पदार्थ हा विषय महत्वाचा मानला आहे.भारतात नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट १९८५ (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे.मालद्वीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन १९६१ झाले.दुसरे संमेलन १९७१ मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले.गैरकानुनी धंद्याच्या विरोधात १९८८ मध्ये तिसरे संमेलन झाले.
या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन,वितरण,सेवन,विक्री,वाहतूक,साठा,वापर,आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे.प्रत्येक व्यक्ती,मुले,मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी,यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय विभागाने उपक्रम राबविण्याचे ठरविले असून त्या अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आमली पदार्थ प्रतिबंध सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चौरे हे होते.
सदर प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एम.तुपे व एन.आर.कुदळे,मोरे सर,प्रा.घोटेकर सर,प्रा.त्रिभुवन सर,प्रा.श्रीमती मस्के मॅडम तसेच बारा वीचे विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”त्यांनी आजची तरुण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात अडकली आहे.ब्राऊन शुगर,कोकेन,गांजा,चरस अशा वेगळ्या पदार्थाचे सेवन करतात.यामुळे माणसाची मती गुंग होऊन तो कोणतेही वाईट कृत्य करण्यास तयार होतो.तो समाजात चार चांगल्या माणसात बसण्याच्या लायक रहात नाही असे सांगितले आहे.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री जुंधारे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री सावळा यांनी मानले आहे.