जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात मोठी चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा बंदोबस्त होण्याचे नाव घेत नाही अशीच घटना नुकतीच उघड झाली असून वडांगळे वस्ती येथील फिर्यादी नितीन हरिभाऊ रोहोम (वय-२९) हे रात्री झोपी गेले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघड असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरातील ५४ हजार रुपयांच्या विविध सोन्याचे दागिन्यांवर व रोख रकमेवर डल्ला मारला असून या प्रकरणी त्यानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील फिर्यादी नितीन हरिभाऊ रोहोम हे आपल्या घरी नुकतेच झोपी गेले असता त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने रात्री १० वाजेनंतर व सकाळ पर्यंत कधीतरी घर उघडे असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून घरातील विविध दागिने लंपास केले आहे.त्यात ३० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आदिसंह ५४ हजारांचा अवैज लंपास केला आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.मात्र कोपरगाव शहराच्या ईशान्येस असलेल्या साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या वडांगळे वस्तीवरील एका घटनेची आणखी भर पडली आहे.

यातील फिर्यादी नितीन हरिभाऊ रोहोम हे आपल्या घरी नुकतेच झोपी गेले असता त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने रात्री १० वाजेनंतर व सकाळ पर्यंत कधीतरी घर उघडे असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून घरातील विविध दागिने लंपास केले आहे.
त्यात ३० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत,१० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ०५ ग्रॅम रिंगा,०१ हजार रुपये किमतीची अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,०१ हजार रुपये किमतीची अर्धा ग्रॅम वजनाची नथ,०१ हजार रुपये किमतीची अर्धा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या,०१ रुपये किमतीच्या ५०० दराच्या नोटा असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी घटनेतील फिर्यादी नितीन रोहोम यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.३६५/२०२३ भा.द.वि.कलम-३८० प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.पुंड हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close