गुन्हे विषयक
तालुका पोलीस दक्ष झाले हो…! सलग दुसऱ्या दिवशी अवैध व्यावसायिकांवर धाडसत्र !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात अवैध व्यवसाय वाढले अशी ओरड झालेली असताना कोपरगाव तालुका पोलीस आता बऱ्यापैकी कार्यप्रवण झाले असून त्यांनी मिळालेल्या गुप्त खबरीनुसार केलेल्या कारवाईत सोनेवाडी येथील अवैध व्यवसाय करणारा आरोपी ताराचंद उर्फ काळू दशरथ वायकर याचे विरुद्ध दारू भट्ट्या उध्वस्त करण्याची कारवाई केली यात सुमारे २८ हजार रुपये किमतीची ४०० लिटर अवैध दारूचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची लक्षवेधी बातमी हाती आली आहे.त्यामुळे नागरिकांनीं समाधान व्यक्त केले आहे.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी थेट धाड टाकल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस सक्रिय झाले असल्याचे दिसून येत असून त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सक्रिय होत दि.२८ जुलै रोजी केलेल्या कारवाईत सोनेवाडी येथील अवैध व्यवसाय करणारा इसम काळु वायकर यांचेवर धाड टाकून त्यात सुमारे २८ हजार किमतीचे ४०० लिटर गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त केले आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत भीती पसरली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप कठीण झाले आहे.काही ठिकाणी दिवसा घरफोडी झाल्या आहेत.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊन नागरिकांची सुटका झालेली नसताना.अवैध व्यवसायाची अशीच घटना नूकतीच समोर आली असून यात तालुक्यातील चासनळी येथील हद्दीत शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना एका खबऱ्याकडुन एक बातमी मिळाली असता त्यांनी केलेल्या कारवाईत विविध रसायन व अन्य अवैज असा सुमारे ०१ लाख २१ हजारांचा अवैज जप्त केला होता.त्यामुळे तालुका पोलिसांच्या भूमिकेवर वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.त्यामुळे त्यांची नाचक्की झाली असल्याचे मानले जात होते.
दरम्यान त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस सक्रिय झाले असल्याचे दिसून आले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दि.२८ जुलै रोजी टाकलेल्या धाडीत सोनेवाडी येथील अवैध व्यवसाय करणारा इसम काळु वायकर हा हाथ भट्टीची दारू निर्माण करत असल्याची विश्वसनींय माहिती हाती आली होती त्यामुळे तालुका पोलीस सक्रिय झाले होते त्यात त्यांनी त्याच्या हातभट्टीवर आज छापा टाकला होता.त्यात सुमारे २८ हजार किमतीचे ४०० लिटर गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त केले आहे.व त्याचा त्याच जागी नायनाट केला आहे.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी आरोपी काळु वायकर याचे विरुद्ध फिर्यादी पो.कॉ.प्रकाश सुरेश नवाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं.३७७/२०२३ महाराष्ट्र दारु प्रतिबंधक कायदा कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींनी धाड टाकली असून या कारवाईत त्यांना पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,अमर गवसने,पो.कॉ.सुरेश नवाळी,गृह रक्षक दलाचे जवान श्री चव्हाण आदींनी साथ दिली आहे.या कारवाईचे नागरिकांनी जोरदार स्वागत तर अवैध व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.