गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात भरदिवसा चोऱ्या,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात चोरीचे सत्र थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही त्यात आणखी दोन गुन्ह्यांची भर पडली असून यातील एक गुन्हा मढी बु.येथील असून यात फिर्यादी बापू एकनाथ गवळी हे आपल्या कुटूंबासह बाहेर नातेवाईकास भेटण्यास गेले असता त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून आतील विविध चीजवस्तू धरून सुमारे ०१ लाख ८६ हजार रुपयांचे विविध दागिने असा अवैज लंपास केला आहे.तर आणखी एका गुन्हयात वसंतराव देवकर यांची होंडा कंपनीची युनिकॉर्न हि एक दुचाकी चोरट्यानी लंपास केली आहे.या दोन्ही प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका आणि शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहिणी अपार्टमेंट येथील राहिवासी असलेले फिर्यादी वसंतराव गजानन देवकर यांची सुमारे ८५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ‘युनिकॉर्न’ हि दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.डी.३९३२) घराचे खाली उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने त्यावर पाळत ठेवून तिचे मुख्य कुलूप तोडून चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.मात्र कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या एक घटनेची आणखी भर पडली आहे.यातील फिर्यादी पत्रकार सिद्धार्थ मेहरखांब हे आपल्या गावी जुन्या घरी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून त्यातील जवळपास ०१.८० हजारांची चोरी झाली असताना आणखी दोन गुन्हे उघड झाले आहे.त्या चोरीचा अद्याप तपास लागलेले नसताना आणखी दोन चोऱ्या उघड झाल्या आहेत.
त्यातील मढी बुद्रुक येथील रहिवासी बापू एकनाथ गवळी (वय-४३) हे आपल्या नातेवाईकाची नुकतीच शस्रक्रिया झाल्याने त्यांना भेटण्यास गेले असता त्यांच्या घरावर अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या घराचे कुलूप,कडी,कोयंडा तोडून आत प्रवेश करून त्यातील कपाटाची उचकापाचक करून ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र,५० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचा राणी हार,८० हजार रुपये किमतीचा चार तोळे वजनाचे पॅडलसह गंठण,०६ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स,१० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा असा एकूण ०१ लाख ८६ हजारांचा ऐवज भर सकाळी ११ ते दुपारी ०४.३० वाजेच्या सुमारास चोरून नेला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी पहिल्या घटनेतील फिर्यादी यांनी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा अनुक्रमे क्रं.३६४/२०२३ भा.द.वि.कलम-४५४,३८० प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सहा.पो.नि.आव्हाड हे करत आहेत.