जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

लव्ह जिहाद प्रकरण उघड,कोपरगाव शहरात संताप,चार जणांविरुद्ध गुन्हा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशभरात लवजिहाद प्रकरणी धुराळा उडालेला असताना त्याचे लोण थेट कोपरगाव शहरात आढळले असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार उघड झाला असून यातील आरोपी सायम कुरेशी याने हिंदू मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिचे चलचित्रण तयार करून तिला बळजबरीने इंदोर येथे नेऊन एका मौलवीकडून धर्मांतरण करण्याची धक्कादायक घटना समोर आल्याने कोपरगाव शहरातील हिंदू नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

श्रद्धा वालकर या तरुणीच्या अमानुष हत्येमुळे ‘लव्ह जिहाद’ च्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्याने गंभीर वळण घेतले होते.श्रद्धाच्या हत्येमुळे देशात संतापाची लाट उसळली होती.असे विवाह का होत आहेत,तरुणी आणि कुटुंबीय यांच्यातील संवाद का हरवू लागला आहे अशा वेगवेगळया पैलूंबाबत धार्मिक,कायदेशीर तसेच समाजशास्त्रीय दृष्टीनेही विविध माध्यमांतून व्यापक चर्चा,विचारमंथन होणे गरजेचे बनले आहे.काही दिवसांपासून या मुद्द्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचंड मोर्चे निघत आहेत.आता कोपरगावात हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांची कमी नाही.कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘लव्ह जिहाद’वर मोठे वक्तव्य केले आहे.त्यांनी बुधवारी दि.०८ मार्च २०२३ रोजी विधानसभेत दावा केला होता की,”महाराष्ट्रात लव्ह जिहादची ०१ लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.श्रद्धा वालकर हत्येसारखी प्रकरणे रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.राज्यात मात्र त्यावर अद्याप कोरडे सोपस्कार सुरु असल्याचे दिसत आहे असे नसते तर अशा आरोपीवर कडक कारवाई झाली असती मात्र असे चित्र दुर्दैवाने दिसत नाही.कारण त्या नंतरही वांरवांर अशी प्रकरणे समोर येत आहेत.त्यातील ताजी घटना नुकतीच कोपरगाव शहरात उघड झाली आहे.यातील मुलगी (वय-२०) हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून आरोपी हा सायम कुरैशी मध्य प्रदेशातील इंदोर येथील जुना पिठा येथील रहिवासी आहे.

या घटनेतील आरोपी याने तीन वर्षांपूर्वी संबंधित फिर्यादी मुलीशी तिच्या भ्रमणध्वनी वरून संपर्क करून व मैत्रीचे नाटक केले व तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दि.२१ मे रोजी सकाळी ०६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आरोपी सायम कुरेशी याने तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.व त्यानंतर तिला कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या बाहेर बोलावून तिला खडकी येथील मदरसा येथे येण्यास सांगितले असता तिने त्यांना त्याबाबत विरोध केला असता आरोपी सायम कुरेशी,ईमरान आयुब शेख,छोटू उर्फ कलीम (पूर्ण नावं माहिती नाही) फय्याज कुरेशी (की अय्याज ?)(पूर्ण नाव माहिती नाही),हा युवक शहर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा भाऊ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.सर्व रा.कोपरगाव.इंदोर येथील मौलवी (याचे पूर्ण नाव माहिती नाही) व इतरांनी फिर्यादीचे हात पाय बांधून फिर्यादीचे अंगाला स्पर्श करून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला तिच्याच दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून खडकी कोपरगाव येथील मदरसा येथे नेऊन आरोपी सायम कुरेशी याने तिच्या मर्जीच्या विरुद्ध शरीर संबंध स्थापित करून त्याचे फिटो व चलचित्रण केले होते.त्यांनतर ते फोटो व चलचित्रण प्रसारित करण्याची धमकी देऊन फिर्यादिस इंदोर येथे बोलावुन घेतले होते.तेथे देखील आरोपीने तिच्या बळजबरीने शारीरिक अत्याचार करून इंदोर येथील मौलवीकडून धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणुन बळजबरीने नमाज पठण करण्यास लावले आहे.तसेच धर्मांतरण करण्यासाठी फिर्यादी मुलीवर आरोपी सायम कुरेशी यांचे सोबत लग्न करण्यासाठी दबाव आणून वेळोवेळी फिर्यादीचे आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली आहे.यातील दोन आरोपींना कोपरगाव पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.दरम्यान या घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३३१/२०२३ भा.द.वि.कलम ३७६,३६३,३५४,३२८,२९५,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close