जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एक लाखासाठी महिलेचा छळ,सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील आपली नणंद अफ्रिन शेख हिच्या लग्नासाठी आपल्या माहेराहून ०१ लाख रुपये आणावे यासाठी आरोपी पती मोसीन शेख,सासु शमा शेख,सासरे फारुक शेख,नंनद तैसिम शेख,नंनद अफरिन शेख,चुलत सासरे असलम शेख व चुलत सासु तरन्नुम शेख,सर्व रा.दावल मलिक बाबा चौक,सुभाषनगर,कोपरगाव आदींनी आपला शारीरिक व मानसिक छळ करून आपल्याला मारहाण,शिवीगाळ व दमदाटी करून घरातून हाकलून दिले असल्याचा गुन्हा फिर्यादी महिला आसमा मोसीन शेख (वय-२७)हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

“१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम ४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली असून.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.मात्र या गुन्ह्यात कमी आल्याचे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम ४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली असून.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.मात्र या गुन्ह्यात कमी आल्याचे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे घडली आहे.
कोपरगाव शहरातील उपनगर असलेले सुभाषनगर येथील,’दावल मालिक’ येथील चौकात रहिवासी असलेली येथील फिर्यादी महिला आसमा शेख हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपले दि.१५ मार्च २०२० रोजी झाल्यानंतर सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस आनंदाचे गेले त्या नंतर आपले सासरच्या मंडळींनी २-३ महिन्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली होती.ती शेवट दि.०४ जून २०२३ पर्यंत असे तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.आपण आपल्या सासरी नांदत असताना आपले पती मोसीन शेख व अन्य आरोपी नातेवाईक यांनी आपली नणंद अफ्रिन शेख हिच्या लग्नासाठी आपल्या माहेराहून ०१ लाख रुपयांची रक्कम आणावी यासाठी आपला छळ सुरु केला होता.वारंवार होणाऱ्या हा छळास कंटाळून आपला छळ सुरु केला होता.त्यास आपण कंटाळून अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या आरोपीत पती मोसीन शेख,सासु शमा शेख,सासरे फारुक शेख,नंनद तैसिम शेख,नंनद अफरिन शेख,चुलत सासरे असलम शेख व चुलत सासु तरन्नुम शेख,सर्व रा.दावल मलिक बाबा चौक,सुभाषनगर,ता.कोपरगाव आदीं सात आरोपींचा समावेश आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला आसमा मोसीन शेख हिने गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक ढिकले यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१५/२०२३ भा.द.वि.कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम.एम.दारकुंडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close