गुन्हे विषयक
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला इसम अमोल लोखंडे (वय-३५) हा बेकायदा जुगार चालवत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यावरून कोपरगाव शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोरक्षनाथ मधुकर आव्हाड यासह दुर्गेश गंगूले आदी नऊ जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शिंगणापूर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज सकाळी ८.४५ वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीकाठी असलेल्या काटवनात झालेल्या कारवाईत आरोपी अशोक उत्तम बोर्डे यास तर १९ हजारांच्या मुद्देमालासह अवैध दारू बनवताना अटक केली आहे.तर अन्य दुसऱ्या घटनेत कोकमठाण शिवारात गोदावरी नदीपात्राची कडेला आरोपी कपिल अभिमान माळी (वय-३५)यास २१ हजारांची अवैध दारू बनवताना अटक केली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून त्यांनी कारवाई सुरु केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांना आपला खबऱ्या मार्फत शिंगणापूर शिवारात रेल्वेस स्थानक रोडलगत जाणारे रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या गळ्याच्या मागील बाजूस एक इसम अवैधरित्या जुगार चालवत असल्याची खबर मिळाली होती.त्या नुसार शहर पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी प्रमुख आरोपी अमोल लक्ष्मण लोखंडे यासह शहरातील दुर्गेश गंगूले यासह गोरक्षनाथ मधुकर आव्हाड(वय-४०)रा.कोपरगाव बेट,कुणाल बाळासाहेब कदम (वय-३०)रा.संजीवनी गेट,स्वप्नील एकनाथ शिंदे (वय-३०) रा.संजीवनीं गेट,चंद्रकात उर्फ मनोज मोहनराव खिलारी (वय-३१),चेतन सुनील शिरसाठ (वय-२३)रा.निवारा,कोपरगाव.भाऊसाहेब भागवत पवार (वय-३८) संजीवनी गेट,विनायक जालिंदर लगड (वय-२८) रा.दत्तनगर,शिंगणापूर,आदी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मात्र यातील आरोपी दुर्गेश गंगूले हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.
दरम्यान या आरोपीत शहर राष्ट्रवादीच्या एका प्रमुख कार्यकर्त्यांचा जवळचा नातेवाईक समाविष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी हारजीतीचा खेळ खेळण्यासाठी आवश्यक असलेली १ ते १० अंकाचे पत्ते,१० हजार ३०० रुपये रोख,१-१० अंक लिहिलेला पट,असा सुमारे १० हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस नाईक सचिन शेवाळे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसानी आपल्या दप्तरी फिर्यादी पो.कॉ.गणेश वशिष्ठ काकडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील जुगाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३२४/२०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ)सह भा.द.वि.कलम १०९ प्रमाणे वरील नऊ जुगाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना.शेवाळे हे करीत आहेत.