आरोग्य
कोपरगावातील,’कोविड लुटी’ची वरिष्ठांनी चौकशी करावी-…या वकिलांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोविड काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना कोपरगाव येथील वैद्यकीय व्यावसायिकांनी सर्व नागरिकांची आर्थिक लूट करून अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत झाले या रॅकेटचा जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून दोषी डॉक्टर व हॉस्पिटल ची मान्यता रद्द करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
कोपरगाव तालुक्यात कोविड काळात संगनमत करून नागरिकांची आर्थिक लूट केली यात सहभागी डॉक्टरांना बक्षिसी म्हणून मोठे पॅकेज व सहल घडवून आणल्याचे कोपरगाव येथील “न्यूजसेवा पोर्टल”ने उघड केले विशेष म्हणजे या आर्थिक लुटीत सरकारी हॉस्पिटल मधील वैद्यकिय अधिकारी देखील सहभागी झाले असल्याचे दिसून आले आहे हे सामान्य नागरिकांना धक्कादायक आहे”-अड्.नितीन पोळ,लोक स्वराज्य आंदोलन.
आपल्या पत्रकात अँड.पोळ पुढे म्हणाले की,”मागील दिड दोन वर्षात संपूर्ण जगात आणि देशात कोविड साथी च्या आजाराने अक्षरशः थैमान घातले अशा वेळी वैद्यकीय व्यावसायिक देवदूत म्हणून या साथीच्या आजारात सामोरे गेले नागरिकांनी जिवंत राहायचे म्हणून हजारो लाखो रुपये खर्च केले एखाद्या पेशंट ला जगवायचे म्हणून आयुष्याची जमा पुंजी खर्च केली डॉक्टर सांगतील ती औषधें मिळेल तिथून व मिळेल त्या दराने खरेदी केले मात्र कोपरगाव शहराच्या वैद्यकीय वर्तुळात मृत्यूचा बाजार मांडला होता हे नुकतेच कोपरगावातील “न्यूजसेवा न्यूज” पोर्टलच्या बातमीवरून समजले आहे. या वैद्यकीय व्यावसायिकांनी संगनमत करून गोरगरीब नागरिकांची मोठी आर्थिक लूट केली असल्याचे समजल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला मात्र यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
कोविड काळात संगनमत करून नागरिकांची आर्थिक लूट केली यात सहभागी डॉक्टरांना बक्षिसी म्हणून मोठे पॅकेज व सहल घडवून आणल्याचे कोपरगाव येथील “न्यूजसेवा पोर्टल”ने उघड केले विशेष म्हणजे या आर्थिक लुटीत सरकारी हॉस्पिटल मधील वैद्यकिय अधिकारी देखील सहभागी झाले असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्या मुळे कोविड काळात जीवाची बाजी लावून सेवा देणाऱ्या या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर नर्स यांना देवदूत म्हणून गौरविण्यात आले होते व वैद्यकीय व्यवसायाकडे सेवा व्रत म्हणून पाहिले जात असताना अनेक नागरिकांना संगनमत करून आर्थिक लूट करून अनेकांच्या जीवितास कारणीभूत असलेल्या या कोविड लुटीची जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी लेखा परीक्षण करणे गरजेचे बनले आहे. व या लुटीत सहभागी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी संबंधित हॉस्पिटलचा व डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणीही अड्.पोळ यांनी शेवटी केली आहे.