आरोग्य
नागरिकांनी निरोगी आयुष्यासाठी वेळ द्यावा-डाॅ.वर्मा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात व आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही मानसिक आर्थिक विवंचनेत असलेल्या माणसाला रक्तदाब शुगर आदि व्याधींचा सामना करावा लागतो आहे हे टाळण्यासाठी रोज सकाळी अर्धा तास व सायंकाळी अर्धा तास वेळ द्यावा पायी चालणे योगासने प्राणायाम करावा कोणत्याही ताणतणावाच्या खाली न राहता मोकळ्या मनाने राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध डॉ.गौरव वर्मा यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समिती श्री स्थानकवासी ओसवाल पंच (सकल जैन समाज) जय लक्ष्मी आई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय रोग अस्थिरोग तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी डॉ.रामदास आव्हाड डॉ.रिद्धी आव्हाड,प्रियंका आढाव,डॉ.वैष्णवी शिंदे,उद्योजक कैलास ठोळे,उत्तमभाई शहा,दत्तोपंत कंगले,रजनीताई गुजराथी,शैलजा रोहोम,डॉ.विलास आचारी,महाविर दगडे,अशोक पापडिवाल,संजय बंब,सुनील बेदमुथा,विकास आढाव,फंड महेश मते,गणेश कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ.गौरव वर्मा डॉ संदिप बोरले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व तपासणी करण्यात येऊन उपचारासाठी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले तर अध्यक्षा सुधा कैलास ठोळे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.