आरोग्य
कोपरगावात उद्या आरोग्य तपासणी शिबिर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात सोमवार दि.०६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अपंग तपासणी शिबिर आयोजित केले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे
सदर शिबिरात अस्थिरोग,तज्ञ मानसोपचार तज्ञ,कान नाक,कान,नाक,घसा,तज्ञ व जिल्हा रुग्णालय येथील टीम येऊन तपासणी करणार आहे.तरी या अपंग शिबिराचा कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये ज्यांना ऑपरेशन मुळे अपंगत्व आलेले आहे व ज्यांची जिल्हा रुग्णालय येथे तपासणी झालेले आहे किंवा नोंदणी झाली आहे त्यांनी या शिबिरासाठी येऊ नये त्यांची तपासणी नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणार असून येणारय्या रुग्णांनी सोबत येतांना आपला फोटो,आधार कार्ड,रेशन कार्ड व उपचाराची कागदपत्रे आदींची मूळ प्रत व झेरॉक्स प्रत सोबत घेऊन यावे असे आवाहनही वैद्यकीय अधीक्षक डॉ.फुलसुंदर यांनी शेवटी केले आहे.