आरोग्य
कोपरगाव तालुक्यात शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान
न्यूजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी) –
कोपरगांव तालुक्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण व्हावे. यासाठी २२ नोव्हेबर ते ३० नोव्हेबर या कालावधील ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. अशी माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगांव शहरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी,२८ नोव्हेंबर रोजी वारी या गावामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांना शंभर टक्के लसीकरणासाठी पथकप्रमुख म्हणून जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी तारीख निहाय लसीकरण मोहीमेची तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर पथक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.२२ नोव्हेंबर रोजी मंजुर, कारवाडी, धामोरी, सांगवी भुसार या गावांमध्ये तालुका गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी , २३ नोव्हेंवर रोजी सुरेगांव, कोळपेवाडी, तिळवणी, आपेगांव या गावांमध्ये पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक,२४ नोव्हेंबर रोजी गोधेगांव, शिरसगांव, ओगदी, अंचलगाव या गावांमध्ये भुमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक,२५ नोव्हेंबर रोजी सोयगांव, रांजणगाव देश, बहादरपुर या गावांमध्ये सहकारी संस्था सहायक निबंधक व पशुवैद्यकीय अधिकारी २६नोव्हेंबर संवत्सर व शिंगणापूर या गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, २७ नोव्हेबर रोजी कोपरगांव शहरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी,२८ नोव्हेंबर रोजी वारी या गावामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांना शंभर टक्के लसीकरणासाठी पथकप्रमुख म्हणून जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल,बी.एल.ओ या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांची यांदी तयारी करून घ्यावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी या गावांमध्ये किमान ५ लसीकरण पथके तयार ठेवावीत. अशा सूचना ही विजय बोरूडे यांनी शेवटी दिल्या आहेत.