आरोग्य
कोपरगाव तालुक्यात अंजनापूर गावात कोरोना योढ्यांचा सत्कार संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर ग्रामपंचायत हद्दीत नुकताच या परिसरातील कोरोना योढ्यांचा सत्कार शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रंगनाथ गव्हाणे यांनी आयोजित केला होता.या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लढाईत तालुक्यातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,परिचारिका,आरोग्य सेवक पोलीस,ग्रामपंचायत कर्मचारी,अधिकारी आदी कोरोना योध्यांनी निर्णायक भूमिका निभावून ही दुसरी लाट नियंत्रणात आणली असून अनेकांचे जीव वाचवले आहे.त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिवसेनेने हा उपक्रम राबवले आहे”-रंगनाथ गव्हाणे,उपतालुका प्रमुख शिवसेना,कोपरगाव तालुका.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३७५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०३ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८७ हजार ३०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ४९ हजार २०८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.१७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ०७३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५६ टक्के असून या लढाईत तालुक्यातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,परिचारिका,आरोग्य सेवक पोलीस,ग्रामपंचायत कर्मचारी,अधिकारी आदी कोरोना योध्यांनी निर्णायक भूमिका निभावून ही दुसरी लाट नियंत्रणात आणली असून अनेकांचे जीव वाचवले आहे.त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
सदर प्रसंगी शिवसेनेच्या अंजनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता आशोक गव्हाणे,
शिवसेना उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे
अशोक गव्हाणे,राजेंद्र गव्हाणे,रामनाथ गव्हाणे,
अशोक आनंदराव गव्हाणे व सर्व आजी माजी सरपंच व सर्व ग्रामपंचात सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.
उपस्थितांचा शाल श्रीफळ मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रंगनाथ गव्हाणे यांनी केले तर उपस्थित अधिकारी कर्मचारी आदींचे अशोक गव्हाणे यांनी आभार मानले आहे.