जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४९९ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात २४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ४७५ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४९६ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत २४ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०३ असे एकूण अहवालात एकूण २७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ३५ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरात व तालुक्यात एकही रुग्णाचे निधन झाले नाही मात्र टाळेबंदी उठवल्याने नागरिकांनी गर्दी केली असून त्यामुळे जास्तीची चिंता वाढली आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार १२५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ३६१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १९९ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ७३ हजार ५०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ९४ हजार ००८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १६.५० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार ५६५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९५.३८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ५७ हजार २५२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ९३७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ४७ हजार ८१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार ४९५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार राज्यातही दहा हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ रोडावली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना आज तालुक्यात गत दोन-तीन दिवसात एकही बळी गेला नाही हि समाधानाची बाब आहे.त्यामुळे आगामी काळ बरा असल्याचे दिसत असले तरी मात्र नगर जिल्हा टाळेबंदीतून उठवला असल्याने नागरिकांनी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असले तरी या उत्साहाच्या भरात नागरिकांनी खरेदीसाठी मोठी झुंबड उडवली आहे.त्यामुळे या गर्दीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.