जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पुन्हा कोरोना वाढण्याची शक्यता-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचे रुग्ण दोन महिन्याच्या टाळेबंदी नंतर कमी झाले आहे.हे सहजसाध्य झालेले नाही मात्र कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे वर्तन पुन्हा गर्दी करण्याकडे झुकू लागले आहे.त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा धोका वाढून ठेवला की काय अशी शंका निर्माण झाली असून त्यासाठी नागरिकांनी केवळ गरजेच्या वेळीच घराबाहेर पडावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“नगर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण कमी झाले आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.कोपरगावाठी रुग्णसंख्या रोडावली असली तरी सरकारने टाळेबंदीतून नुकतीच मुक्तता केली असल्याने अनेक नागरिक चेकाळाले असल्याचे दिसते व विनाकारण फिरताना दिसत असल्याने यातून धोका वाढण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे हा धोका वेळीच ओळखला पाहिजे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

काल राज्यात दहा हजार ८९१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले.तर दिवसभरात १६ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३ टक्के झाले आहे. दरम्यान आज २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे.नगर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण कमी झाले आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.कोपरगावाठी रुग्णसंख्या रोडावली असली तरी सरकारने टाळेबंदीतून नुकतीच मुक्तता केली असल्याने अनेक नागरिक चेकाळाले असल्याचे दिसते व विनाकारण फिरताना दिसत असल्याने यातून धोका वाढण्याची शक्यता असल्याचे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील लहान मोठे व्यावसायिक-दुकानदार व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून जनता संचारबंदी यशस्वी केल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला,मृत्यूचे प्रमाणही कमी झाले.पण आता शासनानेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करायला मान्यता दिली.अचानक सर्वच व्यवसाय सुरू झाल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दि वाढल्याचे दिसते.खरेतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सुरक्षित अंतर न ठेवल्यास पुन्हा प्रादुर्भाव वाढू शकतो.खरेतर नागरिकांनी संचारबंदी नसली तरी फक्त अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे.मुखपट्याविना कुणीही घराबाहेर पडूच नये.कारवाई करायची वेळ येऊ नये.

नागरिकांनी जर नियम पाळले नाहीत,प्रशासनाने दिलेल्या सूचना अमलात आणल्या नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो याचे भान ठेवले पाहिजे.कोपरगाव तालुक्यात नुकताच एक विवाह सोहळा झाला.पण त्या लग्नाला उपस्थित असणाऱ्या पैकी १४ जण कोरोना बाधित झाल्याचे समजते.पुन्हा संचारबंदीची आपत्ती येऊ द्यायची नसेल तर सर्वांनीच आपले व्यवहार करतांना काळजी घेतलीच पाहिजे.दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भाव वाढत गेला तर शासन पुन्हा संचारबंदी जाहिर करू शकते हे प्रत्येकाने लक्षात घेणे महत्वाचे असल्याचेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close