जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना योध्यांचे लसीकरण प्राधान्याने करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोरोनाची दुसऱ्या टप्यातील साथ आता आटोक्यात आली असताना मात्र या लढाईत आपले जीवित धोक्यात घालून या लढाईत उतरलेल्या कोरोना योध्यांनाच अद्याप लस दिलेली नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून ती अग्रक्रमाने द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांचेकडे केली आहे.

“कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा गेल्या दिड वर्षांपासून रात्रंदिवस झटत आहेत.सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.पण त्यांच्याबरोबरच अनेक सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था,समाजसेवक,काही नगरसेवक व कार्यकर्तेही कोरोना योद्धे हे अदखलपात्र करता येणार नाही त्यांनाही प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे”-विजय वहाडणे,अध्यक्ष नगरपरिषद कोपरगाव.

देशात व राज्यात कोरोनाची साथ आता तिसऱ्या टाळेबंदीनानंतर आटोक्यात येताना दिसत असली तरी अद्याप पंधरा जिल्हे रेड झोन मध्ये आहे.तथापि सरकारने लागू केलेल्या या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्यामुळे टाळेबंदी उठवावी अशी मागणी व्यापाऱ्यांपासून नागरिक करत आहेत.आजच्या बैठकीत टाळेबंदी उठणार का,निर्बंध शिथिल होणार की कायम राहणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या असताना दुसरीकडे या लढ्यात आपले जीवित धोक्यात घालून अनेक कोरोना योध्यानी या लढाईत भाग घेऊन हि मोहीम नियंत्रणात आणली असली तरी मात्र सरकारचे त्याचेकंडे दुर्लक्ष झालेले आहे.याबाबत कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रथम आवाज उठवला आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा गेल्या दिड वर्षांपासून रात्रंदिवस झटत आहेत.सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.त्यांचे सर्वांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहेच,पण त्यांच्याबरोबरच अनेक सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था,समाजसेवक,काही नगरसेवक व कार्यकर्तेही कोरोना योद्धे म्हणून आपापल्या परिने कोरोनाशी लढा देत आहेत.हे काम करत असतांना काही प्रमाणात धोकाही संभवतो.म्हणून या कोरोना योध्यांचे “लसीकरण” प्राधान्याने करणे अत्यंत गरजेचे आहे.तसे केल्यास या सर्वजण अजून जास्त हिरीरीने काम करतील.कोपरगाव शहरात “कोरोना वॉर रूमच्या” च्या माध्यमातून सेवा देणारे सर्व युवक,सर्व पत्रकार बंधु व अजूनही असेच काम करणाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय त्वरित घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशी विनंतीही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close