आरोग्य
कोरोना टाळेबंदीत कोपरगावात लक्षवेधी कामगिरी,…या नेत्याचा गौरव !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना साथीने आपला अक्राळविक्राळ केला असताना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना करून हि साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून त्या बद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आ.काळे यांची भेट घेवून त्यांचा गौरव केला आहे.
“मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत आहे.हि तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोपरगाव विधासभा मतदार संघातील एक जागरूक नागरिक या नात्याने आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनी तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करीत आहे”योगेश वाणी,युवा कार्यकर्ते.
यावेळी बोलतांना भाजपाचे विनायक गायकवाड म्हणाले की,”कोविडच्या अदृश्य विषाणूने मागील वर्षापासून सर्वत्र धुमाकूळ घालत लाखो नागरिकांचे प्राण घेतले आहे.यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेच्या रुद्र रूपामुळे तर प्रत्येक नागरिक भयभीत झाला होता.कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली होती तर १८१ नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. मात्र अशा परिस्थितीत आ.काळे यांनी योग्य दिशेने प्रवास केल्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसण्यात मदत झाली.५०० बेडचे कोविड केअर सेंटर,१०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे आयसीयू डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन प्लँटची उभारणी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात ऑक्सिजन प्लँट ची उभारणी उभारणी जनतेला दिलासा दिला आहे.
भाजपाचे योगेश वाणी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत आहे.हि तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोपरगाव विधासभा मतदार संघातील एक जागरूक नागरिक या नात्याने आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनी तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करीत असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,विश्वस्त मन्नूशेठ कृष्णानी,योगेश वाणी,विनायक गायकवाड,दिलीप घोडके, सुरेश कागुणे,राजेंद्र खैरे,किरण वडणेरे,प्रशांत झावरे,प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.