आरोग्य
संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रास वैद्यकीय मदत,ग्रामस्थांत समाधान
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील आनंद फार्मसीच्या वतीने संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना औषधांची मदत नुकतीच केली असल्याची माहिती संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी दिली आहे.या मदतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यभर उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले आनंद ठोळे हे संवत्सर येथे कोविड लस घेण्यासाठी आले असता त्यांना त्या ठिकाणी त्यांना कोरोना औषधांचा तुटवडा आढळला होता.त्या बाबत त्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पारखे,डॉ.खोत,उपसरपंच विवेक यांचेशी चर्चा करून मदतीबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती.त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यानी दुजोरा दिला होता.त्या नूसार हि मदत दिली आहे.
राज्यात कोरोना साथीने कहर केला आहे.त्यामुळे राज्यातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.अनेक ठिकाणी आता रुग्णांना खाटा मिळणे व आवश्यक औषधे मिळणे अवघड बनले आहे.लसी बाबतही तीच स्थिती आहे.संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रातही तीच स्थिती आहे.त्यामुळे आता मदतीसाठी सामाजिक संस्था व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.तीच गरज ओळखून कोपरगाव येथील रहिवाशी मात्र राज्यभर उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले आनंद ठोळे हे संवत्सर येथे कोविड लस घेण्यासाठी आले असता त्यांना त्या ठिकाणी त्यांना कोरोना औषधांचा तुटवडा आढळला होता.त्या बाबत त्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पारखे,डॉ.खोत,उपसरपंच विवेक यांचेशी चर्चा करून मदतीबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती.त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यानी दुजोरा दिला होता.त्या नूसार हि मदत दिली आहे.त्या मदतीत ट्रिपल लेअर मास्क,हात मोजे, कोरोना संच,प्रतिबंधात्मक औषधे,आदीं सुमारे पन्नास हजारांच्या साहित्याचा समावेश आहे.
संवत्सर ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे असून त्या साठी या साहित्याचा मोठा उपयोग होणार आहे.त्या मदतीबाबत उपसरपंच विवेक परजणे डॉ.राजेंद्र पारखे,डॉ.खोत,दिलीपराव ढेपले,लक्ष्मणराव साबळे,प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आदीं मान्यवर उपस्थित होते.