जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात “प्राणवायू प्रकल्पावर” विचार विनिमय सभा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यासह कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाने कहर माजवला असून या साथीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारणे हि काळाची गरज बनली असल्याने कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी तालुक्यात असा प्रकल्प उभारण्यासाठी तालुक्यातील मान्यवरांची नुकतीच सहविचार सभा आयोजित केली होती त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढल्याने रुग्णासंख्या वाढून मृत्युचे प्रमाणही वाढतच आहे.सर्वत्र हाहाकार उडालेला दिसतो आहे.इंजेक्शन व प्राणवायूच्या तुटवड्यामुळे काही हॉस्पिटल बंदच करावे लागतील अशी परिस्थिती आहे.कोपरगावमध्ये “ऑक्सिजन प्रकल्प” उभारून काही प्रमाणात तरी ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे”-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद

राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत.शनिवारी राज्यात तब्बल ६३ हजार २८२ नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ३० हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर नगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात कालअखेर बाधित रुग्ण संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ असून त्यातील ०२ हजार ०१३ जणांचे निधन झाले आहे.अनेक रुग्णालयातील भरती रुग्णांना प्राणवायूची उपलब्धता होत नसल्याने त्यांना टाचा घासून मरण्याचा भयावह व अनास्था प्रसंग गुदरत आहे.अलीकडील काळात तर कोपरगावातील अधिकृत आकडा प्रशासन लपवत आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन हादरले आहे.कोरोना तपासणीसाठी आवश्यक वैद्यकीय साधने अपूर्ण पडत आहे.आगामी काळात तिसरी व चौथी कोरोनाची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाने नियोजन सुरु केले आहे.या पार्श्वभुमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः नगरपरिषदा व महापालिकांनी त्या-त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारावे असे आवाहन नुकतेच केले आहे.या पार्श्वभुमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी तातडीने शहर व तालुक्यातील उद्योजक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभेचे आयोजन केले होते.

सदर प्रसंगी राज्य पतसंस्था पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,उद्योजक अरविंद भन्साळी,राजेश ठोळे,डॉ.महेंद्र गोंधळी,डॉ.योगेश कोठारी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,नितीन औताडे,डॉ.कृष्णा फुलसौन्दर,विजय बडजाते,अजिंक्य भन्साळी,राजकुमार बंब,सुधीर डागा,रिकबशेठ शिंगी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढल्याने रुग्णासंख्या वाढून मृत्युचे प्रमाणही वाढतच आहे.सर्वत्र हाहाकार उडालेला दिसतो आहे.इंजेक्शन व प्राणवायूच्या तुटवड्यामुळे काही हॉस्पिटल बंदच करावे लागतील अशी परिस्थिती आहे.कोपरगावमध्ये “ऑक्सिजन प्लान्ट” उभारून काही प्रमाणात तरी ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

यावेळी सर्वांगिण विचारविनिमय होऊन लवकरात लवकर ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यावर एकमत झाले.या विषयावर पुन्हा बसून अंतिम रूप दिले जाणार आहे असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close