जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात प्राणवायू पुरवठा करणारी रुग्णवाहिका उपलब्ध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या निधीच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठा करणारी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

बाधित रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी यामध्ये आर.टी.पी.सी.आर.,एच.आर.सि.टी. तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यासाठी जावे लागते.कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचार घेण्यासाठी रुग्णांना तातडीने घेऊन जाण्यासाठी या ऑक्सिजन रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होणार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मागील एक महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.या बाधित रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी यामध्ये आर.टी.पी.सी.आर.,एच.आर.सि.टी. तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यासाठी जावे लागते.कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचार घेण्यासाठी रुग्णांना तातडीने घेऊन जाण्यासाठी या ऑक्सिजन रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होणार आहे.या रुग्णवाहिकेचे मंगळवार (२७) रोजी नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे.कोरोण तपासणी संचाची निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी आ.काळे यांनी एक हजार संच आरोग्य विभागाला नुकत्याच उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या एक दोन दिवसात एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतिगृहात १०० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.साईबाबा तपोभूमी येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये शेकडो रुग्ण उपचार घेऊन बरे होत असल्याचा त्यांचा दावा आहेत.या रुग्णवाहिकेमुळे कोरोना बाधित रुग्णांचा जीव वाचण्यास व कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,विश्वस्त मंगेश पाटील,मंदार पहाडे,मन्नूशेठ कृष्णानी,साईबाबा तपोभूमी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रोहित पटेल,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,नगरसेवक राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ.तुषार गलांडे,डॉ.झिया शेख,डॉ.स्वालिया पठाण तसेच महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे वैद्यकीय सेवा देणारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close