आरोग्य
कोपरगाव तालुक्यातील प्राणवायू प्रकल्पांची पोलीस अधिकाऱ्यांकडून पहाणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग लागून १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू तर नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २४ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या हद्दीतील आत्मा मालिक व संत जनार्दन स्वामी आदी ठिकाणच्या कोविड रुग्णालयांना भेटी देऊन प्राणवायू पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांना भेटी देऊन सुरक्षा उपायांची पाहणी करून दक्षता घेतल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील दुर्घटनांमुळे राज्याचा गृह विभाग सजग झाला असून त्यांनी राज्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोविड सेंटरला भेट देण्याचे फर्मान काढले आहे.त्याची अमलबजावणी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आत्मा मालिक हॉस्पिटल,संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल आदी ठिकाणच्या रुग्णालयाच्या हद्दीत असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग लागून १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता तर नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २४ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता.ही घटना ताजी असतानाच विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती.शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.या दुर्घटनांमुळे राज्याचा गृह विभाग सजग झाला असून त्यांनी राज्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोविड सेंटरला भेट देण्याचे फर्मान काढले आहे.त्याची अमलबजावणी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आत्मा मालिक हॉस्पिटल,संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल आदी ठिकाणच्या रुग्णालयाच्या हद्दीत असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.व सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्याचे फर्मान सोडले आहे.सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हि महत्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.