आरोग्य
कोपरगावात कोविडसाठी रुग्णालये अकरा तर खाटा केवळ मर्यादित
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यात कोरोनाचे नवनवे उच्चान्क स्थापन होत असताना कोपरगाव तालुकाही त्यात कमी नाही कोपरगावात आता टाळेबंदी जाहीर झाल्यापासून रुग्णसंख्या निम्म्याने कमी झाली असली तरी मात्र मृत्यू दर मात्र विलक्षणरित्या वाढला आहे.हि बाब काळजी वाढविणारी ठरली असून या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने तालुक्यातील रुग्णालयांची व त्यात सामावून घेणाऱ्या रुग्णांची स्थिती समजून घेतली असता धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यात खाजगी व सरकारी असे एकूण सहा रुग्णालयाने असून त्यांची एकूण खाटांची संख्या ३६५ आहे.तर प्राणवायू पुरविण्यास सक्षम खाटा २४३ आहे.त्यात अतिदक्षता (आय.सी.यू) विभागाच्या केवळ १५ खाटा उपलब्ध आहे.यात एकूण भरती रुग्ण संख्या ३१४ आहे.तर प्रस्तावित रुग्णसंख्या अजून ७५ ने वाढू शकत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आगामी काळात जीव वाचविणे किती कर्मकठीण बाब आहे हे उघड झाले आहे.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत ०१ हजार ६४९ रुग्णांनी आपली मान टाकली आहे तर कोपरगावात आता मृत्यूदराबाबत अधिकारी माहिती लपवू लागले असल्याचे वारंवार दिसू लागले आहे.तरीही गत १९ दिवसात ५० हुन अधिक जणांनी या जगाचा निरोप घेतला आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने तालुक्यातील रुग्ण व त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.काल ६७ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, काल ५४ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत एकूण ३२ लाख ८६ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ६ लाख ९५ हजार ७४७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.१५ टक्के झाले आहे.
राज्यात काल एकूण ५६८ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर १.५४ टक्के आहे. आतापर्यंत एकूण ६१ हजार ९११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या ५६८ मृत्यूंपैकी ३०३ मृत्यू मागील ४८ तासातील आहेत. तर १६० मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.नगर जिल्ह्यात आतापर्यंत ०१ हजार ६४९ रुग्णांनी आपली मान टाकली आहे तर कोपरगावात आता मृत्यूदराबाबत अधिकारी माहिती लपवू लागले असल्याचे वारंवार दिसू लागले आहे.तरीही गत १९ दिवसात ५० हुन अधिक जणांनी या जगाचा निरोप घेतला आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने तालुक्यातील रुग्ण व त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी खालील माहिती उपलब्ध करून दिली आहे.
१) कोपरगाव ग्रामीण रुग्णालय (शासकीय) मंजुर खाटा-३०,ऑक्सिजनसह खाटा-२०,अतिदक्षता विभाग खाटा-१०,व्हेंटिलेटर संख्या-०२,भरती रुग्ण संख्या-३०,प्रतावित रुग्णसंख्या-०२.
२)श्री जनार्दन स्वामी रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-६०,ऑक्सिजनसह खाटा-३०,अतिदक्षता विभाग खाटा-२०,व्हेंटिलेटर संख्या-०२,भरती रुग्ण संख्या-८२,प्रतावित रुग्णसंख्या-३०.
३) आत्मा मालिक रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-४५,ऑक्सिजनसह खाटा-४५,अतिदक्षता विभाग खाटा-०५,व्हेंटिलेटर संख्या-०२,भरती रुग्ण संख्या-५१,प्रतावित रुग्णसंख्या-०६.
४) डॉ.मुळे रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-३०,ऑक्सिजनसह खाटा-१०,अतिदक्षता विभाग खाटा-००,व्हेंटिलेटर संख्या-००,भरती रुग्ण संख्या-३५,प्रतावित रुग्णसंख्या-१०.
५) श्री लाईफ केअर रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-२०,ऑक्सिजनसह खाटा-०८,अतिदक्षता विभाग खाटा-०४,व्हेंटिलेटर संख्या-०१,भरती रुग्ण संख्या-२०,प्रतावित रुग्णसंख्या-०५.
६) तीर्थकर रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-२१,ऑक्सिजनसह खाटा-१६,अतिदक्षता विभाग खाटा-०४,व्हेंटिलेटर संख्या-०२,भरती रुग्ण संख्या-२१,प्रस्तावित रुग्णसंख्या-०५.
७) मानवता स्पेशालिटी जनरल रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-१४,ऑक्सिजनसह खाटा-१४,अतिदक्षता विभाग खाटा-०९,व्हेंटिलेटर संख्या-०१,भरती रुग्ण संख्या-१४,प्रतावित रुग्णसंख्या-०६.
८) कोठारी रुग्णालय (खाजगी) मंजुर खाटा-४०,ऑक्सिजनसह खाटा-१५,अतिदक्षता विभाग खाटा-१३,व्हेंटिलेटर संख्या-०२,भरती रुग्ण संख्या-४६,प्रतावित रुग्णसंख्या-१०.
०९) एस.एस.जी.एम.कॉलेज लेडीज हॉस्टेल,(सरकारी) प्रस्तावित रुग्णालयात मंजुर खाटा-७५,ऑक्सिजनसह खाटा-७५,अतिदक्षता विभाग खाटा-००,व्हेंटिलेटर संख्या-००,भरती रुग्ण संख्या-००,प्रतावित रुग्णसंख्या-००.
यावरून शहर व तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या व उपलब्ध सुविधा यांचा अंदाज सामान्य नागरिकांना सहज येऊ शकतो व त्यातून त्यांची अनावश्यक धावाधाव थांबू शकते यासाठी हि माहिती जनतेस माहितिस्तव देण्यात आली आहे.अद्याप रुग्णांना उपचारार्थ येणार खर्च याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.