आरोग्य
कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिव्हीर,ऑक्सिजन राखीव ठेवा-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगांव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या जीवघेण्या साथीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे,नगरपरिषद,महसूल,पोलीस विभाग,सर्व वैद्यकीय सेवा डॉक्टर-नर्सेस-आशा सेविका-काही शिक्षक,पत्रकार इ. सेवेत असणाऱ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर तातडीने उपलब्ध व्हावेत म्हणून रेमडेसिव्हीर व ऑक्सिजनचा राखीव साठा ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरियषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
“कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत बाधितांना कोरोना योध्ये म्हणून डॉक्टर,अधिकारी,नर्स,आशा सेविका,काही शिक्षक,पोलीस,पत्रकार,आदींचे महत्वाचे योगदान लाभत आहे.मात्र उपचारादरम्यान सध्या सर्वात मोठी अडचण रेमडीसीविर व प्राणवायूची आहे.त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.मात्र या निरागस नागरिकांचे प्राण वाचविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोरोना योद्धयांचा जीवितासाठी काही पावले उचलणे अगत्याचे आहे”-विजय वहाडणे-नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे.काल ६२ हजार ९७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.दिलासादायक बाब म्हणजे काल ५४ हजार २२४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.१४ टक्के झाले आहे.दरम्यान,आज ५१९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा झाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ३९ हजार ५८७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २१ हजार ६३४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख १६ हजार ३३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ६२० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात अठरा दिवसात ४२ जण दगावले आहे.तर गत दोन दिवसात चौदा जणांचे राम नाम सत्य झाले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.या लढाईत कोरोनाग्रस्तांना कोरोना योध्ये म्हणून डॉक्टर,अधिकारी,नर्स,आशा सेविका,काही शिक्षक,पोलीस,पत्रकार,आदींचे महत्वाचे योगदान लाभत आहे.मात्र उपचारादरम्यान सध्या सर्वात मोठी अडचण रेमडीसीविर व प्राणवायूची आहे.त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.मात्र या निरागस नागरिकांचे प्राण वाचविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोरोना योद्धयांचा जीवितासाठी काही पावले उचलणे अगत्याचे आहे.दुर्दैवाने आजपर्यंत अनेक कोरोना योद्धेही सेवा करतांना कोरोनाला बळी पडलेले आहेत.प्रत्यक्षात कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणारे सफाई कर्मचारी तर जास्तच बिकट परिस्थितीत काम करत आहेत.कोरोना योध्यांना व त्यांच्या कुटुंबियांना इंजेक्शन व ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागणे योग्य नाही.म्हणून जिल्हाधिकारी यांनी या मागणीची तातडीने दखल घ्यावी.तरच आपली सर्व यंत्रणा कार्यक्षमतेने काम करू शकेल.प्रत्यक्ष लढणारी यंत्रणा सुदृढ ठेवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.