आरोग्य
..या गावात कुष्ठरोगा विरुद्ध अखेरचे युद्ध मोहीमेस प्रारंभ
जनशक्ती न्यूजसेवा
धारणगाव-(प्रतिनिधी)
मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी धारणगाव येथे कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी संयुक्त सक्रिय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत असुन या मोहीमेचा शुभारंभ सरपंच नानासाहेब चौधरी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
या आधी नोव्हेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यात १०४ कुष्ठरुग्ण आणि क्षयरोगाचे तब्बल ४९० नवीन रुग्ण सापडले होते.
या प्रसंगी सरपंच नानासाहेब चौधरी पोलीस पाटिल नीलकंठ रणशूर,ग्रामपंचायत सदस्य,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पाटील आशासेविका,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दि.०१ डिसेंबर ते १६ डिसेंबर या काळात राबविण्यात येणाऱ्या अभियाना अंर्तगत या आजारांबाबत जनजागृती केली जाणार आहे.
‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ असे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. जिल्ह्यात क्षयरोग व कुष्ठरोगा बाबत जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असुन
‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ असे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. जिल्ह्यात क्षयरोग व कुष्ठरोगा बाबत जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असुन
केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातून कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्य सरकारने कृती आराखडा तयार केला असुन राज्यात या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.तसेच रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार दिले जात आहेत.
या आधी नोव्हेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यात १०४ कुष्ठरुग्ण आणि क्षयरोगाचे तब्बल ४९० नवीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने या रुग्णांना औषधोपचार सुरू केले.आता पुन्हा कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहीती धारणगाव आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पाटील यांनी यावेळी दिली आहे.