आरोग्य
..या गावात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरु
जनशक्ती न्यूजसेवा
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “माझे कुंटुब,माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत कोविड-१९चा प्रार्दुभाव रोखण्या साठी ग्रामस्थांची रॅपिड अँटिजिन टेस्ट केल्याची माहिती सरपंच नानासाहेब चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
महाराष्ट्रात वेगाने पसरत चाललेला करोना आटोक्यात आणण्यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधींपासून सामान्य लोकांसह सर्वांचा सहभाग असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीं या योजनेची घोषणा केली आहे.राज्यात करोनाने उग्र रुप धारण केले आहे.या पार्श्वभूमीवर हि योजना धारण गावातही राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात वेगाने पसरत चाललेला करोना आटोक्यात आणण्यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधींपासून सामान्य लोकांसह सर्वांचा सहभाग असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीं या योजनेची घोषणा केली आहे.राज्यात करोनाने उग्र रुप धारण केले आहे. सारा देश आज करोनाग्रस्त महाराष्ट्राचे आता काय होणार या चिंतेत आहे.तब्बल १५ लाख ०६ हजार ०१८ करोना रुग्णांची संख्या झाली असून रोजच्या रोज २० ते २४ हजार नवीन रुग्ण सापडत आहेत.गेले चार दिवस रोज ४०० हून अधिक करोना रुग्णांचा मृत्यू होत असून करोना रुग्णांच्या संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे कामही कोणत्याही जिल्ह्यात योग्यप्रकारे होत नाही.यातून करोनाचा संसर्ग वेगाने पसरत चालला असून मुखपट्या व सुरक्षित अंतराचे पालन लोकांकडून केले जात नाही.करोनाला आता सहा महिने होत असल्याने शासकीय तसेच आरोग्य यंत्रणेत ही एक शैथिल्य आले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचे महत्व वादातीत आहे.या पार्श्वभूमीवर हि तपासणी मोहीम धारणगावात हि सुरु आहे.या मोहीमे अंतर्गत दि.१५ सप्टेबर ते १० ऑक्टोबर या पहील्या टप्यात घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभुमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी कर्मचारी पथकाने धारणगाव येथे आरोग्य तपासणी मोहीम राबविली असुन या मोहीमे अंतर्गत १७ नागरीकांची रॅपिड अँटिजिन टेस्ट केली असुन सर्वांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहीती डॉ.आदित्य पाटील यांनी दिली आहे.या मोहीमेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.आदित्य पाटील,धारणगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ.आर.एस खरे,मुर्शतपुरचे आरोग्य सेवक डॉ.ए.एम.चव्हाण,डॉ.एम.ही माळी आशा सेविका योगीता सुरे,गंगासागर कुहिटे,आशा पवार,अर्चना सांगळे,वच्छला सुरे या पथकाने या कामी परीश्वम घेतले असुन सरपंच नानासाहेब चौधरी,ग्रामसेविका पि.के.अहिरे,गाव कामगार तलाठी धनंजय कऱ्हाड,पो.पाटील निळकंठ रणशुर यांचे सहकार्य लाभले.नागरीकांनी विनाकारण बाहेर फिरू नये मुखपट्या व कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा नियमित वापर करावा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन सरपंच नानासाहेब चौधरी यांनी शेवटी केले आहे.