जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावाच्या ग्रामीण भागात आजही मोठी रुग्ण वाढ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २०१ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात २३ बाधित आढळले आहे.तर ४० संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील ०६ तर नगर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी ३० स्राव पाठवले आहे.आज एकूण बाधित २९ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान टिळकनगर येथील ६० वर्षीय पुरुषाचे निधन झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ४१ हजार ४१९ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६७२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत सप्ताहात दिवसात चार बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.

आज आलेल्या यादीत शहरात १४ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १५ असे २९ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज कोपरगाव ग्रामीण भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे लक्ष्मीनगर दोन महिला वय-५५,३६, गवारेनगर पुरुष वय-५०,विवेकानंदनगर पुरुष वय-२५,गांधीनगर पुरुष वय-५१,रचना पार्क पुरुष वय-३९,गुलमोहर कॉलनी पुरुष वय-२८,शिवाजी रोड पुरुष वय-३८, कोपरगाव पुरुष वय-२८ (भागाचे नाव देण्याचे टाळले),महादेवनगर २ पुरुष वय-२२,२५, महिला वय-२०,२१,धारणगाव रोड पुरुष वय-५८,आदींचा समावेश आहे.

तर कोपरगाव शहरात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे-संवत्सर दोन महिला वय-५७,१९माहेगाव देशमुख दोन पुरुष वय-५२,३०,साखरवाडी पुरुष वय-२२,मुर्शतपूर महिला वय-४९,कुंभारी पुरुष वय-२९,वेळापूर पुरुष वय-३३,वारी पाच पुरुष वय-६४,५५,५७,तीन महिला वय-३६,५४,४१,कोळपेवाडी पुरुष वय-५८,आदींचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ८३६ इतकी झाली आहे.त्यात १२९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७९ टक्के आहे.आतापर्यंत ०८ हजार ५९२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ३४ हजार ३६८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.३६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ६७४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९१.१७ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण भागातील मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close