कोपरगाव तालुका
..या गावात विविध विकास कामांची उदघाटने संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे १४ व्या वित्त आयोगातून प्रगती महिला ग्रामसंघ कार्यालय,स्मशानभूमी परिसर तार संरक्षक भिंतिसह विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे. तसेच यावेळी महाराष्ट्र सरकारच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या विविध सरकारी दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत या वरील कामखेरीज डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर लगत आर.सी.सी.पाईप गटार,स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण,दवंगे वस्ती शाळा संरक्षक भिंत आदी कामांचे उदघाटन व महादेव मंदिर सभामंडप बांधकाम,स्मशानभूमी परिसर पाण्याची टाकी बांधकाम,जिल्हा परिषद गावठाण शाळा संरक्षक भिंत बांधणे,लिलावाडी येथे काँक्रिटीकरण करणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

यावेळी कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,संचालक अरुण चंद्रे,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,सदस्य अनिल कदम,श्रावण आसने,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता श्री. दिघे,उपअभियंता उत्तमराव पवार,अर्जुनराव दवंगे,सरदारभाई पठाण,फक्कडराव आदमाने,बबनराव गाडे,दत्तात्रय शिंदे,सरपंच गोरक्षनाथ दवंगे,उपसरपंच विलास दवंगे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक बी.ओ. पाटील,महिला बचत गट अध्यक्षा,उपाध्यक्षा, सर्व सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.