जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ आरोपींच्या जामीनाबाबत झाला हा निर्णय !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात दि.०६ डिसेंबर रोजी मागील भांडणांच्या कारणावरून दोन गटात हाणामारी,दंगल ऍट्रॉसिटीच्या घटनेतील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात अपील केले होते त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून या ऍट्रॉसिटी व दंगलीच्या गुंह्यातील आरोपींना काही अटी शर्तीवर अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने राजेंद्र निर्मळ,नारायण घोरपडे,शिवाजी कदम यासह दहा आरोपी व काही महिला आरोपीना न्या.एस.बी.देसाई यांनी जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती विधीज्ञ जयंत जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली  आहे.

  

   सदर प्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे खटला दाखल नाही.आरोपींचा यात सहभाग स्पष्ट होत नाही.आरोपीवरचे आरोप हे राजकीय वादातून असून त्यास वेगळा रंग दिला जात असा युक्तीवाद  करून आरोपींचे वकील अड्.जयंत जोशी यांनी आरोपींचा जमीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला असता तो जिल्हा व सत्र न्यायालयाने काही अटी शर्तीवर३० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,”सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अ.नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये पिंपरी निर्मळ गावातील तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते.याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.७३६/२०२३ विविध कलमान्वये दि.०७ डिसेंबर रोजी ऍट्रॉसिटीचा गुन्हा विविध कलमान्वये दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर गाव पातळीवर गाव बंद ठेवत मोठा राडा झाला होता.मात्र या दोन गटांमध्ये पोलिसांच्या सहकार्याने वादावर पडदा टाकण्यात आला होता.परंतु बुधवार दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी रात्री या मागील भांडणाच्या कारणावरून गावातील एका गटाच्या जमावाने दोन घरांना लक्ष करीत संतप्त झालेल्या १०० ते १२५ लोकांच्या जमावाने घरांची तोडफोड,जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान करताना काहींना गंभीर मारहाण केली होती.या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले असता संतप्त झालेल्या जमावातील काही जणांनी या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एका पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडे फाडून त्याचा मोबाईल हिसकवला तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या त्यानंतर जमाव निघून गेला असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.

  

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिलेने (वय-४५) दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात ६८ आरोपी व ४०-५० नागरिक व १० महिला अशा एकूण जवळपास १२८ जणांविरोधात अॅट्रोसीटीसह मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपी सोपान कारभारी निर्मळ,विकास बाळकृष्ण निर्मळ,मयूर भिमराज निर्मळ,भाऊसाहेब रावसाहेब दारुवाले,आदित्य भाऊसाहेब दारुवाले आदी पाच आरोपींना राहाता पोलिसांनी अटक केली होती.तर अन्य आरोपी अद्याप फरार झाले होते.

   दरम्यान अटक पाच आरोपींची कोठडी २१ डिसेंबर रोजी संपल्याने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीं त्यांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.बी.देसाई यांचेसमोर हजर करुन त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा असा अर्ज केला होता मात्र तो फेटाळला होता.
  दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींचा नियमित जामीन मंजूर केला असला तरी उर्वरित आरोपींचा अटक पूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता.त्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या छ.संभाजींनगर खंडपीठात अपील केले होते.त्यात उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने अटी शर्तीसह अंतरिम अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

   सदर प्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे खटला दाखल नाही.आरोपींचा यात सहभाग स्पष्ट होत नाही.आरोपीवरचे आरोप हे राजकीय वादातून असून त्यास वेगळा रंग दिला जात असा युक्तीवाद  करून आरोपींचे वकील अड्.जयंत जोशी यांनी आरोपींचा जमीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला असता तो जिल्हा व सत्र न्यायालयाने काही अटी शर्तीवर मंजूर केला आहे.त्यात राजेंद्र निर्मळ,नारायण घोरपडे,शिवाजी कदम यासह दहा आरोपी व काही महिला आरोपीना न्या.एस.बी.देसाई यांनी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केल्याने त्यांना तूर्त दिलासा मिळाला असल्याची माहिती विधीज्ञ जयंत जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली  आहे.

   दरम्यान या खटल्यात उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर येथील खंडपीठात विधीज्ञ शैलेश चपळगावकर यांनी तर जिल्हा न्यायालय येथे सरकारी पक्षाच्या वतीने अड्.अशोक वहाडणे यांनी तर आरोपींच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी काम पहिले आहे.त्यांना अड्.व्यंकटेश ख्रिस्ते,अड्.योगेश दाभाडे,अड्.शिवम मोरे,अड्.सुजय होन,अड्.सुरेंद्र जाधव,अड्.प्रशांत कोते,अड्.तन्मय घोडके आदींनी सहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close