आरोग्य
…या संघटनेच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सखी सर्कल सदस्यांच्या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सर बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी व त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याच्या सवयीसाठी ‘सखी सर्कल’च्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

या शिबिरात शिर्डी येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सई देशमुख तसेच कोपरगावातील डॉ. रोशनी आढाव,डॉ.आस्था तिरमखे,डॉ.मेघा गोंधळी,डॉ.दिपाली आचार्य या तज्ज्ञ डॉक्टरांनी महिला डॉक्टरांनी योगदान दिले आहे.
त्यावेळी डॉक्टरांनी महिलांना कॅन्सर या रोगाची लक्षणे,प्रतिबंधात्मक उपाय व नियमित तपासणीचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी सखी सर्कल’च्या सदस्या स्वाती संदीप कोयटे,सिमरन खुबाणी,शालिनी खुबाणी आदींनी योगदान दिले आहे.
या शिबिरात विविध गटातील एकूण ४५ महिलांनी सहभाग नोंदवला तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.