आरोग्य
…या शहरात नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा दि १३ मार्च २०२५ रोजी संस्थांनच्या श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम) येथे देणगीदार साई भक्त डॉ.कोंडा संगीता रेड्डी यांच्या हस्ते व श्री साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब भा.प्र.से व संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला आहे.

या नेत्रपेढीच्या माध्यमातून अनेक दृष्टीहीनांना दृष्टी प्राप्त होणार असुन त्याचबरोबर मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्या जवळची सोय शिर्डी येथे निर्माण झाली आहे.त्यामुळे याचा लाभ शिर्डी व शिर्डी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या गरजवंत रुग्णांना होणार असुन त्यामुळे त्यांच्या जिवनाला श्री साईबाबांचे अशिर्वादाने कलाटणी भेटणार आहे.
संस्थांनच्या रुग्णालयात श्री साईबाबांच्या नावे नेत्रपेढी सुरू व्हावी याकरिता संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाने नेत्र पिढी सुरू करण्यासंबंधीच्या सर्व मान्यता संस्थांन रुग्णालयाला प्रदान केल्या आहेत.
या नेत्रपेढीच्या माध्यमातून अनेक दृष्टीहीनांना दृष्टी प्राप्त होणार असुन त्याचबरोबर मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्या जवळची सोय शिर्डी येथे निर्माण झाली आहे.त्यामुळे याचा लाभ शिर्डी व शिर्डी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या गरजवंत रुग्णांना होणार असुन त्यामुळे त्यांच्या जिवनाला श्री साईबाबांचे अशिर्वादाने कलाटणी भेटणार आहे. येथील सर्व कर्मचारी यांनी श्री साईबाबांचा रुग्ण्सेवेचा वसा मोठया भक्तीभावाने जपला आहे. येथील कर्मचारी यांचे काम पाहुन मी भारावुन गेलेले आहे. असे प्रतिपादन उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलताना देणगीदार साईभक्त डॉ.कोंडा संगिता रेडडी यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देणगीदार साईभक्त यांचे आभार माणुन त्यांचा याप्रसंगी श्रींची मुर्ती व शॉल देवुन सत्कार केला आपल्या सारख्यांच देणगीदारांच्या कृपाशिर्वादानेच आम्ही श्री साईबाबांचा रुग्णसेवेचा वसा सुरु ठेवला आहे.
यावेळी वैद्यकीय संचालक,लेफ्ट कर्नल,डॉ.शैलेश ओक, से.नि,प्र.उप वैद्यकीय संचालक,डॉ.प्रितम वडगावे,प्र.उप वैद्यकीय अधिक्षक, डॉ.मैथिली पितांबरे,डॉ.पदमा, डॉ.अजित पाटील,डॉ.सौदामिनी निघुते,डॉ.अनघा विखे, डॉ योगेश गेठे, डॉ.अशोक गावित्रे, डॉ उज्ज्वला काळे, डॉ मधुरा जोशी,जनसंपर्क अधिकारी श्री सुरेश टोलमारे, प्र.अधिसेविका नजमा सय्यद व इतर कर्मचारी उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमाचं सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वै.अधिक्षिका डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले आहे.