जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

मोफत त्‍वचा रोग तपासणी शिबीराचे उद्घाटन

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   
   शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था व सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट,म्‍हैसुर यांचे संयुक्‍त विद्यमाने मोफत त्‍वचारोग तपासणी शिबीर आज दिनांक २४ ऑक्‍टोबर २०२४ ते २६ ऑक्‍टोबर २०२४ या दरम्‍यान श्री.साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम)  येथे आयोजीत करण्‍यात आलेले होते.या शिबीराचा उद्घाटन  समारंभ श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से यांचे अध्‍यक्षतेखाली श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे सकाळी १०.०० वा  मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

त्वचारोगासाठी कोणताही सर्वोत्तम उपचार नाही.उपचार योजना तयार करण्यापूर्वी,त्वचाविज्ञानी प्रत्येक रुग्णासाठी सर्वोत्तम काय आहे याचा विचार करतो.हे करण्यासाठी, तुमचा त्वचाविज्ञानी तुमचे वय,एकूण आरोग्य आणि तुमच्या जीवनावर रोगाचा काय परिणाम होतो याचा विचार करतो.


   त्वचारोगासाठी कोणताही सर्वोत्तम उपचार नाही.उपचार योजना तयार करण्यापूर्वी,त्वचाविज्ञानी प्रत्येक रुग्णासाठी सर्वोत्तम काय आहे याचा विचार करतो.हे करण्यासाठी, तुमचा त्वचाविज्ञानी तुमचे वय,एकूण आरोग्य आणि तुमच्या जीवनावर रोगाचा काय परिणाम होतो याचा विचार करतो.त्वचारोगाचा प्रकार,तो शरीरावर कुठे दिसतो आणि त्याची प्रगती कशी होत आहे या गोष्टी देखील महत्त्वाच्या भूमिका बजावतात.या त्वचा रोग शिबिराचे आयोजन शिर्डी येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबीरासाठी महाराष्‍ट्रभरातुन  ३१० रुग्‍णांनी नोंदणी केलेली असुन अजुन नोंदणी  सुरु आहे.येत्‍या तीन दिवसात  शिबीरामध्‍ये  जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांनी  सहभागी होवुन शिबीराच्‍या माध्‍यमातुन होणा-या रुग्‍णसेवेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी बोलताना  केले.

     सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट,म्‍हैसुर येथील त्‍वचारोग तज्ञ डॉ.शिवाणी एस.आर.,डॉ.हंमसा सी.एन.व श्री साईनाथ रुग्‍णालयातील त्‍वचारोग तज्ञ डॉ. कांबळे यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करणेत आला.

    याप्रसंगी श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ.शैलेश ओक,प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे,प्र.वैद्यकीय अधीक्षक डॉ.मैथिली पितांबरे,कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष,प्र.अधीसेविका नजमा सय्यद,सहा अधिसेविका मंदा थोरात,जनसंपर्क अधिकारी (रुग्‍णालये) सुरेश टोलमारे यांच्यासह श्री साईनाथ रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.शिबीर यशस्‍वी व्‍हावे  यासाठी श्री साईनाथ रुग्‍णालयातील सर्व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close