कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात हवामान तज्ज्ञ डख येणार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीच्या वर्धापन दीना निमित्त शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख हे उपस्थित राहणार असून प्रमुख सदर प्रसंगी तालुक्याचे आ.आशुतोष काळे,महंत स्वामी गोवर्धन गिरीजी महाराज,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत वाबळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“सुरेगाव ग्रामपंचायत हि तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत मानली जाते.त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजपयोगी योजना राबवल्या आहेत.याच सुरेगाव ग्रामपंचायतीचा आगामी २४ फेब्रुवारी रोजी “६५ वा वर्धापन दिन” संपन्न होत आहे त्या साठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे”-शशिकांत वाबळे,सरपंच,सुरेगाव ग्रामपंचायत ता.कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हि तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत मानली जाते.त्या ठिकाणी सरपंच शशिकांत वाबळे यांनी तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजपयोगी योजना राबवल्या आहेत.याच सुरेगाव ग्रामपंचायतीचा आगामी २४ फेब्रुवारी रोजी ‘६५ वा वर्धापन दिन’ संपन्न होत आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिक कोळपे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.त्यासाठी सुरेगावसह परिसरातील नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपसरपंच मच्छीन्द्र हाळनोर,ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर,ग्रामपंचायत सदस्य आदिनी केले आहे.