कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात…या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अवैध धंदे आजही तेजीत सुरु आहे.या अवैध व्यवसायांनी गावाची शांतता भंग होते त्या अनुषंगाने पढेगावच्या ग्रामसभेत सर्वानुमते गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आचार संहितेमुळे पुढे ढकललेली ग्रामसभा आज दि.०७ रोजी सरपंच मिनाताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली आहे.ग्रामपंचायत सदस्यांत एकुण ०६ महिला सदस्या आहे.परंतु त्यातील एकही सदस्या उपस्थित नसल्याने भानुदास शिंदे यांनी निषेधाचा ठराव मांडला होता.त्याला मंजुरी प्राप्त झाली आहे.तथापि सदर ठिकाणी एकही सरकारी दारूचे दुकान नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.
आचार संहितेमुळे पुढे ढकललेली ग्रामसभा आज दि.०७ रोजी सरपंच मिनाताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली आहे.ग्रामपंचायत सदस्यांत एकुण ०६ महिला सदस्या आहे.परंतु त्यातील एकही सदस्या उपस्थित नसल्याने भानुदास शिंदे यांनी निषेधाचा ठराव मांडला होता.७० लक्ष रुपयांची पाणी टाकीचे आणि पाईपलाईन योजनेचे काम सुरु झाले मात्र त्यात पाण्याचा स्रोत समाविष्ट नसल्याने नागरीकांनी अगोदर पाण्याचा स्रोत निर्माण करण्याची मागणी करुन,गाव सी.सी.टि.व्हि.च्या देखरेखीखाली आणण्याची सुचना मांडली होती.
दरम्यान प्रत्येक कामाचे फलक,’ड’ यादीचे वाचन,गाव अंतर्गत रस्त्यांची कामे,ग्रामसुरक्षा संदेशाचा ध्वनी कर्मचारी किंवा पदाधिकारी यांचाच असावा अशा विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न होऊन ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड यांनी विषयांचे वाचन केले आहे.तर शेवटी मोहन कर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.