कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा आट्रॉसिटी गुन्हा दाखल !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात ऑगष्ट महिन्याच्या शेवटी मंजूर व नंतर तीळवणी ग्रामपंचायत हद्दीत ऍट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल होऊन त्यात एक जण ठार झाला असल्याचे प्रकरण ताजे असताना आज मळेगाव थडी या ठिकाणी पुन्हा एक घटना समोर आली असून यात फिर्यादीच्या मागास समाजाच्या मुलाचा जातीचा उल्लेख करून जमीन खरेदी करण्याच्या कारणावरून आरोपी म्हसू नामदेव खोंड,सागर नामदेव खोंड,राहुल म्हसू खोंड,सचिन भाऊसाहेब खोंड आदींनी फिर्यादीच्या मुलगा सचिन सयाजी मोरे यास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी सयाजी मोरे यांचा मुलगा सचिन मोरे हा मळेगाव थडी येथील जमीन कसीत आहे.सदर जमीन विक्रीस निघाली होती.ती जमीन सदर आरोपीना मिळाली नाही याचा राग मनात धरून दीड एकर जमीन त्या आरोपीस दिली नाही याचा त्याने राग मनात धरला होता.त्यावरून दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरोपी म्हसु नामदेव खोंड,सागर नामदेव खोंड,राहुल म्हसू खोंड,सचिन भाऊराव खोंड आदींनी फिर्यादी यांचा मुलगा सचिन मोरे (वय-३०)यास जातीवाचक शिवीगाळ करून जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”यातील फिर्यादी यांची मेहुणी सरलाबाई किशोर चक्रनारायण रा.मळेगाव थडी हीचे मालकीची जमीन मळेगाव थडी हद्दीत असून ती फिर्यादी सयाजी मोरे यांचा मुलगा सचिन मोरे हा कसीत आहे.सदर जमीन विक्रीस निघाली होती.ती जमीन सदर आरोपीना मिळाली नाही याचा राग मनात धरून दीड एकर जमीन त्या आरोपीस दिली नाही याचा त्याने राग मनात धरला होता.त्यावरून दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरोपी म्हसु नामदेव खोंड,सागर नामदेव खोंड,राहुल म्हसू खोंड,सचिन भाऊराव खोंड आदींनी फिर्यादी यांचा मुलगा सचिन मोरे (वय-३०)यास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन म्हसु नामदेव खोंड यांनी गजाने,सागर म्हसु खोंड लाकडी दांड्याने,राहुल म्हसू खोंड व सचिन भाऊराव खोंड यांनी त्यांचे हातात विटा धरून फिर्यादी यांचा मुलगा सचिन सयाजी मोरे यास मारहाण करून जखमी करून त्याचे डाव्या पायात फॅक्चर करून दुखापत केली आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.१५ नोव्हेंबर रोजी रात्री ४.४७ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान गावातील परिस्थिती तणावाची पण शांततेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.-४५३/२०२२ भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,५०६ सह अ.जा.जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारणा कायदा-२०१५ चे कलम ३(१)(जी),३(१)(आर) ३(१) (एस) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजय सातव हे करीत आहेत.