कोपरगाव तालुका
…या तालुक्यातील पथदिवे,पाणी पुरवठा यांचा विज पुरवठा सुरळीत-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना व रस्त्यावरील पथदिव्यांचा वीजपुरवठा श्री.साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पूर्ववत करण्यात आला असल्याचा दावा त्यांच्या प्रसिद्धी विभागाने केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना उत्पंनाचे ठोस साधन नाही.नागरिकांकडून मिळणारा कर अत्यल्प असून मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत.त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर होत आहे.त्यामुळे ग्राम पंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवठा योजना व पथ दिवे यांचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकले आहे त्यामुळे आ.काळे यांनी हि मध्यस्थी केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना व पथदिवे आदींचा वीजपुरवठा विज बिल थकल्यामुळे खंडित करण्यात आला होता.याबाबत अनेक गावातील सरपंच,उपसरपंच यांनी त्या-त्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी आ.काळे यांच्यापुढे मांडल्या होत्या तसेच स्ट्रीट लाईट चा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे अनेक गावात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याचा दावा केला होता.याची दखल घेवून त्यांनी महावितरण मुख्य अभियंता कुंठेकर व अधीक्षक अभियंता काटे यांना निवेदन देवून ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीची सविस्तर माहिती दिली होती.
अनेक ग्रामपंचायतींना उत्पंनाचे ठोस साधन नाही.नागरिकांकडून मिळणारा कर अत्यल्प असून मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत.त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर होत आहे.त्यामुळे ग्राम पंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवठा योजना व पथ दिवे यांचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकले आहे.
कर वसुली नियमित झाल्या नंतर या ग्रामपंचायती महावितरणचे थकित वीज बिल अदा करतील.मात्र वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होत असून नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा योजना व पथदिवे यांचा वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करावा अशी मागणी त्यांनी केली होती.त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महावितरण कडून या गावातील पाणीपुरवठा योजना व पथदिवे यांचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.त्यामुळे या गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.