कोपरगाव तालुका
…या ग्रामपंचायतीच्या उदघाटनाला सदस्यांचा अघोषित बहिष्कार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला आहे.त्यावेळी ग्रामपंचायतीच्या या कार्यक्रमास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी अघोषित बहिष्कार घातल्याने निष्पन्न झाले असून त्याची दुसऱ्यांदा पुनरावृत्ती घडल्याने तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.त्याला सदस्यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान आ.काळें यांनी सदर कार्यक्रमात बोलताना उत्तर भारतीयांसह स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव पान या प्रशस्त रस्त्याला ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना तो कुठे गेला ? याबाबत सविस्तर मौन पाळले आहे.त्यामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली असून त्यावर अनेक अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुमारे वीस लाख रुपये खर्चाच्या नूतन इमारतीस मागील वर्षी मंजुरी मिळाली होती.त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.त्याचे लोकार्पण नुकतेच साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले त्या प्रसंगी हि धक्कादायक घटना उघड झाली आहे.यावेळी उपस्थितांना नजीकच्या गावातून ग्रामस्थांना निमंत्रित करावे लागण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.
दरम्यान या ठिकाणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर साधारण एक वर्षापूर्वीच अविश्वास ठराव दाखल झाला होता.मात्र केवळ तांत्रिक कारणाने सदर पदाधिकारी बचावला होता.त्या नंतर अद्यापही या ठिकाणी काळे गटास बहुमत नाही.मात्र वर्तमान पदाधिकारी सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने उदघाटनासह दुसऱ्यांदा असा बाका प्रसंग ओढवला आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,राहुल रोहमारे,रोहिदास होन,एम.टी.रोहमारे,सरपंच बाबुराव थोरात,के.डी.खालकर,युवराज गांगवे,दत्तात्रय गांगवे,देवेन रोहमारे,नंदकिशोर औताडे,किसन पाडेकर,केशव जावळे,प्रभाकर गुंजाळ,योगेश औताडे,कौसर सय्यद,बाबासाहेब गुंजाळ,दिलीप जुंधारे,ऍड.योगेश खालकर,साहेबराव कांडेकर,रामनाथ कांडेकर,अमोल पाडेकर,लक्ष्मण थोरात,शिवाजी भोसले,कैलास गव्हाणे,बळीराम गव्हाणे,गोरक्षनाथ थोरात,रमेश गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,बाळासाहेब रहाणे,सिकंदर इनामदार आदींसह बोटावर मोजण्याइतके ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी बोलताना आ.आशुतोष काळे म्हणाले की,”मागील पाच वर्षात विकासाच्या बाबतीत वंचित असलेल्या नैऋत्य भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.या भागातील बहुतांश नागरिक वाड्या वस्त्यांवर राहत असून प्रत्येक नागरिकांना अपेक्षा आहे की,आपल्या घरापर्यंत चांगला रस्ता असावा.त्यादृष्टीने या भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याबरोबरच पाणी,आरोग्य,वीज आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील राहू असे आश्वासन दिले आहे.