कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.प्रवेश केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यामध्ये रविंद्र वाबळे,किशोर वाबळे,सोपान कदम,दिगंबर कदम या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात विकास कामे पाहून त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांते रवींद्र वाबळे यांनी सांगितले आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघात विकास कामे पाहून त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते शिवाजी वाबळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,भैय्यासाहेब वाबळे,श्रीधर कदम,रविंद्र देवकर,सुदाम वाबळे,नानासाहेब कदम,मनोज वाबळे,शांताराम वाबळे,अमोल वाबळे,गणेश सुपनर,मयुर सारडा आदी उपस्थित होते.