कोपरगाव तालुका
दरोडा प्रकरणी ..या नेत्याचा घर मालकास दिलासा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथे अशोक वाणी यांच्या वस्तीवर सोमवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून कुटुंबियांना मारहाण करून दहशत केली होती.सदर घटनेची माहिती मिळताच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी जावून वाणी कुटुंबियांना दिलासा दिला आहे.
राहाता तालुक्यातील जळगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत अशोक वाणी व प्रकाश वाणी जखमी झाले आहेत.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.त्यांच्या देखील प्रकृतीची विचारपूस ना.काळे यांनी यावेळी केली आहे.
राहाता तालुक्यातील जळगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत अशोक वाणी व प्रकाश वाणी जखमी झाले आहेत.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.त्यांच्या देखील प्रकृतीची विचारपूस ना.काळे यांनी यावेळी केली आहे.तसेच जळगाव श्रीरामपूरचे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सदरच्या घटनेचा तातडीने तपास करून गुन्हेगारांना अटक करावी व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
यावेळी सुभाष वाणी,प्रकाश वाणी,शंकरराव चौधरी,सरपंच शिवाजी साबदे,सदस्य दिलीप चौधरी,मच्छिंद्र चौधरी,किरण चौधरी ग्रामसेवक श्रीमती सूर्यवंशी उपस्थित होते.