कोपरगाव तालुका
माहेश्वरी महिला मंडळातर्फे मान्यवर महिलांचा सत्कार संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात गेल्या बावीस वर्षांपासून महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग शिक्षिका विमलताई पुंडे या परिश्रम घेत आहेत.योग वर्गाच्या माध्यमातून योगासने व प्राणायामाचे त्या निरपेक्ष वृत्तीने काम करीत आहेत.तसेच गायन क्षेत्रात कोपरगावाला सातासमुद्रापार नावलौकिक मिळवून देत असलेली सुरभी कुलकर्णी यांचा सत्कार माहेश्वरी महिला मंडळातर्फे मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
“कोवीड संकटातही टाळेबंदीच्या काळात महामारीच्या दहशतीत वावरणाऱ्या महिलांना मानसिक आधार दिला.निर्बंधांमुळे त्यांना ऑनलाईन योगासने प्राणायामाचे धडे दिले.निर्बंध काहीसे शिथील झाल्यानंतर खुल्या मैदानात,सुरक्षित अंतर पाळत योगाभ्यास घेतला गेला आहे”-किरण डागा,अध्यक्षा,माहेश्वरी महिला मंडळ कोपरगाव.
सदर प्रसंगी शोभा चांडक,सरला राठी,सुमित्रा कुलकर्णी,रोहिणी पुंडे,सुनिता भुतडा,सुनंदा राठी, रमा झंवर,डॉ.वर्षा झंवर,संगीता झंवर,मेघा बजाज,सरला डागा,सुवर्णा राठी,आकांक्षा भट्टड, सोमाणी भाभी,कांचन राठी व माहेश्वरी मंडळातील अनेक महिला उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा किरण डागा यांनी मनोगत व्यक्त करताना,”अगदी कोवीड संकटातही टाळेबंदीच्या काळात महामारीच्या दहशतीत वावरणाऱ्या महिलांना मानसिक आधार दिला.निर्बंधांमुळे त्यांना ऑनलाईन योगासने प्राणायामाचे धडे दिले.निर्बंध काहीसे शिथील झाल्यानंतर खुल्या मैदानात,सुरक्षित अंतर पाळत योगाभ्यास घेतला गेला.जलनेती सारखी श्वसन मार्ग शुद्धी क्रिया शिकवून सराव करून घेतला.कोवीडच्या संक्रमणापासून आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित योगाभ्यास आणि खबरदारीचे धडे दिले आहे”