कोपरगाव तालुका
शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरे हेच माझे गुरू-माजी मंत्री घोलप
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हेच माझे शिक्षक-गुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी कोपरगाव तालुक्यात भोजडे ग्रामपंचायत हद्दीत एका लार्यक्रमात बोलताना केले आहे.
सौ.राधाबाई काळे विद्यालय भोजडे येथे कार्यरत असलेले मुख्यध्यापक पोटे हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक असुन सेवेत असतांना अत्यंत शिस्तप्रिय व आदर्श शिक्षक म्हणून ते परिचित होते त्यांनी घडविलेले अनेक विध्यार्थी विविध क्षेत्रात अग्रेसर आहे”-बबनराव घोलप माजी मंत्री.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे रयत शिक्षण संस्थेचे सुशीलामाई शंकरराव काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव पोटे यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणुन माजी समाजकल्याण मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष भाऊसाहेब सिनगर होते.
यावेळी कार्यक्रमात निवृत्त पोलिस अधिकारी कविवर्य सुभाष सोनवणे,रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी वाळुंजकर,नाशिक मनपाचे माजी उपायुक्त दत्तात्रय गोतिसे,शिवव्यख्याते गणेश कांबळे,ह.भ.प.अनर्थे महाराज,ह.भ.प.नरोडे महाराज,माजी तहसीलदार डी.आर.दुशिंग,दिलीप कानडे,माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,नानासाहेब सिनगर,शहाराम सिनगर,अशोक काजळे,अजित सिनगर,दत्ता दुशिंग,संजय सरवार,युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे,गणेश कानडे,माधव पोटे मेजर, संतोष कानडे,राजेंद्र पोटेसर,सौ पोटे,मॅडम,पाळंदे सर,कैलास शेळकेसर,सोमनाथ थोरात,अधोडे सर,तुपे सर,कैलास सातपुते सर,रितेश पोटे,शेख मॅडम,सुराळकर मॅडम,देवकर सर,शिक्षक सर्व विध्यार्थी व पालक भोजडे गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोटेसर यांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की गुरुचे स्थान महत्त्वाचे असुन आपल्या जिवनाला योग्य दिशा देत परिवर्तन घडविण्याचे काम गुरु करतात असेच माझ्या जिवनात माझे गुरू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाळकडू दिल्याने फारसे शिक्षण नसतांनाही ५३ वर्षे शिवसेनेचे काम करीत असताना आपण घडलो पहिल्या निवडणुकीत माझा पराभव झाल्यावर शिवसेना प्रमुखांनी मला मातोश्री वर बोलाऊन चांगला लढलास म्हणुन पाठीवर थाप देत आशीर्वाद दिला आता ज्या मतदारांनी तुला मतदान केले त्यांच्यासाठी कामाला लाग असा आदेश दिला होता आपण त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामाला लागलो आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या कामाची दखल घेत जनतेने मला ७८ हजार मतांनी निवडुन दिले आणि माझ्या मतदारसंघात मला सातत्याने पाच वेळा निवडून दिले हे सर्व माझे गुरु शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या आशीर्वादानेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले
निवृत्ती नंतर स्वस्थ न बसता यापुढे पोटे सरांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकुन घेऊन काम करत राहावे असे सांगुन घोलप यांनी त्यांचा सपत्निक सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सत्काराला उत्तर देतांना पोटे सर म्हणाले की विध्यार्थ्यांना यापुढेंही कायम मार्गदर्शन करत राहील व समाजसेवा देखील अविरतपणे सुरु राहील अशी ग्वाही देत सेवा काळातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.संकेत पोटे यांनी केले या कार्यक्रमात निवृत्त पोलिस अधिकारी कविवर्य सुभाष सोनवणे यांनी काव्य सादरीकरण केले,रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी वाळुंजकर सर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती दिली,नाशिक मनपाचे माजी उपायुक्त दत्तात्रय गोतिसे,शिवव्यख्याते गणेश कांबळे सर,ह.भ.प.अनर्थे महाराज,ह.भ.प.नरोडे महाराज,माजी तहसीलदार डी.आर.दुशिंग,दिलीप कानडे,माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माळोदे यांनी मानले.