जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महिलेवर अत्याचार,तिघांवर गुन्हा दाखल,उलटसुलट चर्चा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर शिवारात एका बत्तीस वर्षीय महिलेवर त्याच गावातील आरोपी राहुल सोनवणे, विशाल गिरे, सोमनाथ गायकवाड आदींनी मक्याच्या शेतात नेऊन शारीरिक अत्याचार केल्याचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेबाबत या परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून हि घटना वास्तवाजवळ जाणारी नसल्याचे बोलले जात असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी भेट दिली असून आपण प्रथमदर्शनी या बाबत काही बोलणार नाही मात्र यात सत्य जे असेल ते कठोरपणे समोर आणणार असल्याचे म्हटले आहे.घटनास्थळी या बाबत काही पुरावे नसल्याची माहिती असून स्थानिक ग्रामस्थांत मात्र या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले असून या घटनेला जुन्या भांडणाचे कंगोरे असल्याचे बोलले जात आहे.जवळच्या जेष्ठांचा हा गुन्हा दाखल करण्यास विरोध होता अशी माहिती हाती आली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस संवत्सर हि ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीत बिरोबा चौक हे रहिवासी वाडी गणली जाते.या वाडीत फिर्यादी महिला आपल्या कुटुंबियासमवेत अधिवास करते.त्याच परिसरात हि महिला आपल्या जनावरांना नजीकच्या रानोडे यांच्या मकाच्या शेतात गवत आणण्यासाठी रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी गेली असता तेथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास तीन आरोपी आले.त्यांनी हि महिला गवत कापत असताना यातील आरोपी सोमनाथ गायकवाड याने या महिलेचे तोंड दाबून धरले तर विशाल गिरे याने तिचे पाय पकडून व आरोपी राहुल सोनवणे याने हात पकडून तिला उचलून नेऊन आरोपी सोमनाथ गायकवाड याने तोंड दाबून धरले व आरोपी राहुल सोनवणे व विशाल गिरे याने आळीपाळीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या बाबत कोणाला काही सांगितले तर पती व मुलगा यांना जिवंत मारण्याची धमकी देऊन फिर्यादी माहिलेला शेतात सोडून देऊन निघून गेले असल्याचे या महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिर्डी उपवीभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून कोपरगाव शहर पोलिसानी गु.र.नं.६८/२०२० भा.द.वि.कलम ३७६ (ड),५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close