कोपरगाव तालुका
किरण राव यांचा कोपरगाव तालुक्यात सत्कार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी- कान्हेगाव रेल्वेस्थानक येथे अमीर खान फिल्मस प्रोड्युकॅशन कंपनी निर्मित “2 ब्राईडस” या हिंदी सिनेमाचे चित्रीकरण सध्या रेल्वे स्थानक वारी येथे सुरु आहे.त्या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेत्री किरणराव या चित्रीकरण स्थळावर वारीत तळ ठोकुन आहेत याचे औचित्य साधुन वारी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी किरण राव यांच्या “पाणि फाउंडेशन “च्या सामाजिक कार्याबद्दल ग्रामपंचायत वारीच्या वतीने प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश कानडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार केला आहे.
वारी- कान्हेगाव रेल्वेस्थानक येथे अमीर खान फिल्मस प्रोड्युकॅशन कंपनी निर्मित “2 ब्राईडस” या हिंदी सिनेमाचे चित्रीकरण सध्या रेल्वे स्थानक वारी येथे सुरु आहे. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी साठी अभिनेते अमिर खान यांच्या पत्नी तथा सिनेमा च्या डायरेक्टर व प्रसिद्ध अभिनेत्री किरणराव या चित्रीकरण स्थळावर वारीत तळ ठोकुन आहेत त्या निमित्त हा सत्कार करण्यात आला आहे.
तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने चित्रीकरण युनिटचे प्रमुख एकदंत फिल्मस नाशिकचे अमित कुलकर्णी व जसपाल डोगरा यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी किरण राव यांनी ग्रामस्थांचे आभार मानले तर ग्रामस्थांच्या वतीने अशोक कानडे यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगत प्रोजेक्ट करिता शुभेच्छा दिल्या चित्रीकरण युनिटचे अमित कुलकर्णी यांनी बोलताना अभिनेते तथा राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या सहकार्या बद्दल त्यांचे तसेच सत्कार केल्या बद्दल वारी ग्रामस्थांचे आभार मानले आहे.
सदर प्रसंगी चित्रपट युनिटचे सुमित कुलकर्णी,चेतन कुलकर्णी,पल्लवी कदम यांचे सह पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे, उपसरपंच विशाल गोर्डे,ग्रामविकास अधिकारी दिलीपराव वारकर,जेष्ठ नेते नामदेवराव जाधव,बबनराव मैराळ,किसन जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड,संजय जाधव,प्रकाशराव गोर्डे,दिलीपराव देशमुख,राहुल शिंदे, प्रशांत संत,वसंतराव वारकर,संदीप जाधव,हरी टेके, अनिल सिंग,आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.