जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

श्री काशी विश्वनाथ ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी शिर्डीतील कोते

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रसंत सद्गुरु जनार्धन स्वामी महाराज ( बेट ) कोपरगाव ट्रस्टच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्धल शिर्डी येथील जनार्दन स्वामी भक्त विलास कोते यांची नुकतीच निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांचा सत्कार स्थापत्य अभियंता माधवराव पाटील यांनी मोठया उत्साहात केला आहे.

श्री काशी विश्वनाथ महादेव,गो-पालन ट्रस्टची स्थापना केली होती.त्या ट्रस्टचे पाहिले अध्यक्ष होण्याचा मान मोहनराव चव्हाण यांना मिळाला होता.त्यांचे नुकतेच निधन झाले असून त्या जागी उपाध्यक्ष असलेले दत्तात्रय होळकर सर यांची निवड झाली होती.तर उपाध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होणार याकडे भक्तांचे लक्ष लागून होते.ती प्रतीक्षा नुकतीच संपली असून त्या जागी शिर्डी या पावन भूमीतील जनार्दन स्वामी यांचे निष्ठावान पाईक विलास कोते यांची निवड झाली आहे.

संपूर्ण विश्वाने,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्ती भारतात आहे.आजही असे दिव्य संस्कार,दिव्य संत महापुरुष,दिव्यज्ञान आणि दिव्य ग्रंथावली भारतात सहज सुलभतेने प्राप्त होते हि वस्तुस्थिती आहे.त्याच दिव्य संत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज.जनसामान्यांना जडवादांच्या जीवनदृष्टीतून जागे करण्याचे महतकार्य जनार्दन स्वामींनी जन्मभर जाणीवपूर्वक जोपासलेले आहेत.दिनांक २४ सप्टेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पुण्यभूमीत सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या जनार्दन स्वामींचे अंगी श्रद्धा,शुचिता,अस्मिता,द्या,प्रेम,परोपकर,क्षमा अशा दैवी गुणांचे दर्शन त्यांच्या बालपणीच्याच आचार -विचारावून सर्वांना समजले होते.स्वामीजींनी प्रथम वारकरी सांप्रदायातील भक्ती प्रेम प्रमेयांची साधना करून अल्पकाळातच पातंजली योग सूत्राचे आधारे योगसिद्ध प्राप्त केली.जटाजूटवल्कलेदारी रुद्राक्ष,भस्म विभूषित अशी त्यागमूर्ती समोर पाहताच पाहणारे नतमस्तक होत.सान्निध्यात येणाऱ्या जनसामान्यांना जीवनसृष्टीत स्वर्गीय सौंदर्य संपन्नता आणि स्वानंद निर्माण करण्याचे प्रेरणादायी सामर्थ्य स्वामीजींचे अंगी होते.त्यांची समाधी कोपरगाव बेट येथे असून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या हयातीतच श्री काशी विश्वनाथ महादेव,गो-पालन ट्रस्टची स्थापना केली होती.त्या ट्रस्टचे पाहिले अध्यक्ष होण्याचा मान मोहनराव चव्हाण यांना मिळाला होता.त्यांचे नुकतेच निधन झाले असून त्या जागी उपाध्यक्ष असलेले दत्तात्रय होळकर सर यांची निवड झाली होती.तर उपाध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होणार याकडे भक्तांचे लक्ष लागून होते.ती प्रतीक्षा नुकतीच संपली असून त्या जागी शिर्डी या पावन भूमीतील जनार्दन स्वामी यांचे निष्ठावान पाईक विलास कोते यांची निवड झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे पिताश्री माधवराव पाटील यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी श्रीराम इंडस्ट्री चे मालक विजय कडू पाटील , माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,विलास आबांचे वडील बाबाजींच्या जुन्या काळातील शिष्य शिर्डी चे मारुतराव कोते पाटील , त्यांचे बंधू राजेंद्र काका कोते पाटील, शिर्डी चे माजी नगराध्यक्ष कैलास कोते हे ही उपस्थित होते.

उपस्थितांनी त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close