ग्रामविकास
शासनाच्या योजना राबविण्यावर …या ग्रामसभेत चर्चा

न्यूजसेवा
संवत्सर- (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सरगावची विशेष ग्रामसभा सरपंच सुलोचना ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून या ग्रामसभेतील विषयांचे व ठरावांचे उपसरपंच विवेक परजणे यांनी वाचन केले आहे.यात विशेषतः मतदार नोंदणी व मतदारांची यादी तयार करणे तसेच नवीन मतदान नोंदणी करणे मयत मतदाराची नोंद कमी करणे याबाबत सभेत सविस्तर चर्चा झाली आहे.

“गोदावरीचे जायकवाडीसाठी जाणारे पाणी खाली न जाऊ देता मराठवाड्याने मृतसाठ्याचा वापर करावा.मधमेश्वर गोदावरी कश्यपी ही धरणे नाशिक व नगर जिल्ह्यासाठी तयार केलेले असून त्या पाण्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा व मराठवाड्यासाठी जाणाऱ्या पाण्यासाठी विरोध करावा असाही ठराव या सभेत करण्यात आला आहे”-सुलोचना ढेपले,सरपंच,संवत्सर ग्रामपंचायत.
आयुष्यमान भारत कार्ड सर्वांनी ऑनलाइन करून घेणे त्याचा लाभ पिवळे रेशन धारक केशरी रेशन धारक सर्वांनाच पाच लाखापर्यंतची आरोग्य पॉलिसी पंतप्रधान योजनेतून जाहीर झालेली आहे त्याचे कार्ड सर्वांनी काढून घेण्याबरोबरच पंतप्रधान विश्वकर्मा ही योजना लोहार,सुतार,कुंभार,धोबी व इतर मागासवर्गासाठी असून त्यांनी त्याचे प्रशिक्षण घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे ग्रामसभेत ठराव करण्यात आला.गोदावरीचे जायकवाडीसाठी जाणारे पाणी खाली न जाऊ देता मराठवाड्याने मृतसाठ्याचा वापर करावा.मधमेश्वर गोदावरी कश्यपी ही धरणे नाशिक व नगर जिल्ह्यासाठी तयार केलेले असून त्या पाण्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा व मराठवाड्यासाठी जाणाऱ्या पाण्यासाठी विरोध करावा असाही ठराव या सभेत करण्यात आला आहे.
‘चालू वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असून आपलं गाव हे पाऊस न पडल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर करावे’असा ठराव देखील या ठिकाणी घेण्यात आला आहे.’एक रुपयात पिक विमा या योजनेचा लाभ संपूर्ण शेतकऱ्यास मिळण्यासाठी २५% रक्कम दिवाळीपूर्वी सरकारने अदा करावी’ हा ठराव देखील सर्वानुमते पास करण्यात आला दुष्काळजन्य परिस्थिती असल्याकारणाने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा,गोदावरी मध्ये दूषित पाण्याचा वापर न करू देण्याचा ठरावही योगेश शिंदे यांनी मांडला आहे.
ग्रामसभेसाठी प्राथमिक शिक्षक अंगणवाडी सेविका,कृषी अधिकारी सावंत,विद्युत मंडळाचे अधिकारी बोडकळ, प्राथमिक आरोग्य केंद्र श्री महाजन व गावातील चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मण साबळे,लक्ष्मणराव परजणे,अॅड.लोहकणे,शिवाजी गायकवाड,दिलीप ढेपले,खंडू फेपाळे,अनिल आचारी,महेश परजणे,हबीब तांबोळी,अविनाश गायकवाड,नामदेव पावडे,सुधाकर बारहाते,बापू गायकवाड,बापूसाहेब बाराहाते.बाळासाहेब दहे.श्री अहिरे भाऊसाहेब व समस्त गावकरी उपस्थित होते.