जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात…या दोन गावांना जलजीवन मिशन निधी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगावला जलजीवन मिशन योजने अंतर्गत ५४.८१ लाख व ओगदीसाठी ५७.०१ लाख रुपये निधी मिळाला आहे. या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

“कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचा सोडवावा अशी प्राधान्याने मागणी येत होती.त्या मागणीची दखल घेवून २०१९ पासून आजतागायत २६० कोटीचा निधी पाणी पुरवठा योजनांना निधी मंजूर केला आहे”-आ.आशुतोष काळे.

दि.१५ ऑगस्ट २०१९ रोजी घोषित केलेले,जल जीवन मिशन (जेजेएम) २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्तेच्या पुरेशा प्रमाणात नळाच्या पाण्याच्या पुरवठ्याची तरतूद करण्यासाठी राज्यांच्या प्रत्येकी ४५ टक्के भागीदारीत तर १० ग्रामपंचायतीने भरावयाची असून या तत्वावर ती राबविण्यात येत आहे.कोपरगाव तालुक्यात पढेगाव आणि ओगडी या दोन गावांसाठी हि योजना मंजूर झाली आहे.त्याचे भूमिपूजन नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी कारभारी आगवण,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीप बोरनारे,पं. स.माजी उपसभापती अर्जुन काळे,माजी संचालक बाळासाहेब बारहाते,दिलीप दाणे,उपसरपंच मनोज शिंदे,संतोष शिंदे,बाबासाहेब शिंदे,भानुदास शिंदे,किरण शिंदे,सांडूभाई पठाण,एकनाथ शिंदे,ओगदीचे उपसरपंच सोमनाथ जोरवर,गणेश गोणटे,बाळासाहेब भालेराव,सुरेश जोरवर,पं.स.उपअभियंता सी.डी. लाटे,शाखा अभियंता अश्विन वाघ,ठेकेदार दिपक देशमुख शांताराम चंदन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर प्रसंगी आ.काळे यांच्या ९.६५ लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,”कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचा सोडवावा अशी प्राधान्याने मागणी येत होती.त्या मागणीची दखल घेवून २०१९ पासून आजतागायत २६० कोटीचा निधी पाणी पुरवठा योजनांना दिला आहे.या निधीतून काही योजनांचे काम पूर्ण झाले असून अनेक योजनांचे काम प्रगतीपथावर असून अजूनही काही गावांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असून त्या गावांचे देखील पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदर प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कारभारी आगवण यांनी प्रास्तविक केले तर उपस्थितांचे आभार कर्मवीर उपसरपंच मनोज शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close