जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नागरिकत्व कायद्याची जनजागृती करणार कोण-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारताच्या या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या नागरिक्तवा बाबतची दोनही विधेयकाला केवळ मोदी द्वेषाने पछाडलेले विरोधक किळसवाणा विरोध करत असताना भाजपात केवळ मतांवर लक्ष ठेऊन आलेले आयाराम नेते आता कुठे आहे व त्या बाबत ते मौन पाळून का बसले आहेत अशी विचारणा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी आ. कोल्हे यांचे नाव न घेता नेमक्या वेळी विचारला आहे.

देशाची धर्मशाळा होत असताना भाजप कार्यकर्ते व नेते यांनी शांत बसता कामा नये.ज्याप्रमाणे निवडणूक जिंकण्यासाठी नेते दारोदार पायपीट करतात त्यांनी आता सुद्धा घरोघरी जाऊन या विधेयकाचे महत्व सांगून त्याबद्दलचे गैरसमज, गैरप्रचार किती चुकीचे व राजकिय हेतूने प्रेरित आहेत हे नागरिकांना पटवून दिले पाहिजे.

देशात नागरिकत्व कायद्या वरून काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी रान उठवले असताना भाजप मधील गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांवर डोळा ठेऊन भाजपात आलेल्या आधुनिक संस्थानिकांनी व आयाराम नेत्यांनी सोयीस्कर मौन पाळणे पसंत केल्याने भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे.वास्तविक पक्ष अडचणीत असल्यावर नेते आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजात जो अपप्रचार सुरू ठेवला आहे त्यावर रान उठवणे गरजेचे आहे मात्र उत्तर नगर जिल्ह्यात मात्र भाजपात आलेल्या नेत्यांनी या नागरिकत्व कायद्यावर जाहीर मौन पाळून आपला पळून जाण्याचा बेत असल्यागत वर्तन केल्याने कोपरगाव नगर परिषदेच्या अध्यक्ष विजय वाहाडणे यांचे पित्त खवळले आहे.त्यांनी या नेमक्या विषयाला छेडल्याने त्यांचे भाजपच्या नेत्यांना समाधान पावले असल्याचे मानले जात आहे.

केवळ पक्षनिधी देणाऱ्या आयारामांना कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसविल्याने काय होते याचा सर्वांनाच धडा नुकताच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेला आहे.पक्षनिष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून उमेदवाऱ्या दिल्याने मोदी लाट असूनही आपले आमदारांची संख्या कमी का झाली याचा गंभीरपणे विचार राज्यातील नेत्यांनी केला पाहिजे.

आपल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,देशात विरोधी पक्षाने केंद्र सरकारला धारेवर धरले असताना पक्षात आलेल्या नेत्यांची भूमिका नेमकी समोर येणे आवश्यक आहे.त्यांनी या लढाईत विचार मंथन करण्यासाठी तयार झाले पाहिजे.
देशाची धर्मशाळा होत असताना भाजप कार्यकर्ते व नेते यांनी शांत बसता कामा नये.ज्याप्रमाणे निवडणूक जिंकण्यासाठी नेते दारोदार पायपीट करतात त्यांनी आता सुद्धा घरोघरी जाऊन या विधेयकाचे महत्व सांगून त्याबद्दलचे गैरसमज, गैरप्रचार किती चुकीचे व राजकिय हेतूने प्रेरित आहेत हे नागरिकांना पटवून दिले पाहिजे.केवळ मतांच्या गठ्यासाठी कुणी जर केंद्र सरकारच्या देशहितासाठी महत्वाच्या असलेल्या विधेयकाचे समर्थनासाठी पुढे यायचे टाळणार असतील तर त्यांची गंभीर दखल पक्षाने घेतली पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर एकतर्फी,अन्यायकारक,पातळीहीन टिका होत असताना आपले काहीच देणेघेणे नाही असे वागणाऱ्याना भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी समज द्यावी व विधेयकाचे समर्थन करणाऱ्या प्रामाणिक पक्षनिष्ठ कार्यकर्ते- व नेत्यांनाच निवडणुकीत उमेदवारी देतांना आणि भाजपाचे पदाधिकारी नेमतांना प्राधान्य द्यावे.केवळ पक्षनिधी देणाऱ्या आयारामांना कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसविल्याने काय होते याचा सर्वांनाच धडा नुकताच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेला आहे.पक्षनिष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून उमेदवाऱ्या दिल्याने मोदी लाट असूनही आपले आमदारांची संख्या कमी का झाली याचा गंभीरपणे विचार राज्यातील नेत्यांनी केला पाहिजे.असे आवाहनही विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close