कोपरगाव तालुका
लॅन्ड लाईन फोन जोडणार सॅटेलाइट वर-बोरावके यांची माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत संचार निगमने काँग्रेस राजवटीतील २००४-२०१४ या दहा वर्षांच्या कालखण्डांत याखात्यात २ जी स्पेक्ट्रम भ्रष्टाचार होऊन कोणताही बदल केला नाही परिणामी भारत संचार निगम तोट्यात जाऊन हि सरकारी कंपनी काळाच्या मागे पडली आहे हे वास्तव स्वीकारून कंपनीने भाजपच्या कालखंडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत आपल्यात खूप बदल करण्याचा निर्णय घेतला असून आगामी कालखंडात कंपनी लॅन्ड लाईन फोन सॅटेलाइटवर जोडून क्रांती घडवून आणणार असल्याचे प्रतिपादन भारत संचार निगम कंपनीचे नूतन संचालक व ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष अड्.रवींद्र बोरावके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
आपल्या खेरीज देशभरातून उत्तर प्रदेश येथील मनोज चौधरी,आसाम मणिपूर या पूर्वोत्तर या राज्यातून सिकोजाम किपगेम तर दिव-दमण येथून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती पटेल यांची वर्णी लागली आहे.अड्.बोरावके यांच्या निवडीमागे राज्याचे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिफारस असल्याचे मानले जात आहे.कोपरगावातून माजी प्रदेशाध्यक्ष खा.वहाडणे,माजी खा.भीमराव बडदे विधानसभेचे माजी सभापती फरांदे यांच्या नंतर हि सर्वोच्च निवड मानली जात आहे.
भाजपाचे प्रदेश भाजपचे सदस्य अड्.रवींद्र बोरावके यांची नुकतीच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र बोरावके यांनी भारत संचार निगमच्या संचालक पदी निवड केली असून अशी निवड होणारे ते चौथे संचालक आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांची नुकतीच पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली आहे.त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी कोपरगाव येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”देशातील सर्वात मोठ्या असलेल्या या कंपनीवर देश भरातून केवळ चार तर महाराष्ट्रातून केवळ एक संचालकाची निवड करण्यात आली आहे.आपली या ठिकाणी वर्णी लागणे हि आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.आपण या पदावर आलो यात खरी बाब हि आपण भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ना.स.फरांदे व स्व.सूर्यभान वहाडणे यांची कृपा मानली पाहिजे.त्याच्या हाताखाली आपण घडलो असून त्यांच्या विचाराने आपण वाटचाल केली आहे.त्याचेच हे फलित आहे.
आपल्या खेरीज देशभरातून उत्तर प्रदेश येथील मनोज चौधरी हे संचालक असून ते वैद्यकीय क्षेत्रातून आले आहे.शिवाय आसाम मणिपूर या पूर्वोत्तर या राज्यातून सिकोजाम किपगेम यांची वर्णी लागली आहे.ते एका शाळेचे प्रमुख प्राचार्य आहे.तर दिव-दमण येथून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती पटेल यांची वर्णी लागली आहे.तर अन्य आठ संचालकातून सहा संचालक हे भारत संचार निगमचे वरिष्ठ अधिकारी आहेत.त्यात संशोधक,मार्केटिंग,प्रोजेक्ट.एच.आर.आदीचा समावेश आहे.या शिवाय केंद्राने नियुक्त केलेले दोन संचालक असून त्यात वित्त विभागाचे सचिव,टेलिकॉम मंत्रालयाचे सचिव आदींचा समावेश आहे.
या कंपनीची देश भरात जवळपास १.२४ लाख कोटींची स्थावर मालमत्ता असून या कंपनीचा सर्वात मोठा कारभार आहे.देशभरात कंपनीचे एकूण १.२५ लाख कर्मचारी होते.आता मधील काळात स्वेच्छा निवृत्ती देऊन कंपनीने आर्थिक भार कमी केला आहे.वर्तमानात आता ७० हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.आता देशभरात कंपनीचे चार विभाग आहे.महाराष्ट्र सर्कल मध्ये महाराष्ट्र,गुजरात,गोवा,कर्नाटक,दिव दमण आदींचा समावेश आहे.वर्तमानात कंपनी तोट्यात आहे याची कबुली देऊन त्यांनी आगामी काळात या कंपनीच्या कर्जाला सरकार जामीन असून आगामी काळात कंपनी विविध योजना देशभर आणत असून त्यातून तोटा भरून काढणार आहे.
हि कंपनी पूर्वी एक खाते होते.मात्र आता हा विभाग दि.३० सप्टेबर २००० रोजी स्वतंत्र केला आहे.व १५ ऑक्टोबर २००० रोजी कंपनीची स्थापना केली असून देशात इंटरनेट युग अवतरले आहे.देशभरात कंपनीचे ६५ ते ७० टक्के ब्रॉड बँड असून हि संख्या सर्वाधिक आहे.या शिवाय वायफाय सेवा हि सर्वाधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.या कंपनीचे देशात व परदेशात नेट उपलब्ध असून जागतिक पातळीवर हि कंपनी काम करत आहे.
कंपनीच्या देशात चार उपकंपन्या असून त्यातून ऑप्टिकल फायबर केबल,टेलिफोन,अन्य साहित्य आदींची निर्मिती केली जाते.देशात तीन प्रशिक्षण संस्था असून त्यातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे.देशभरात चोवीस विविध विभाग असून विविध ग्राहक केंद्राच्या माध्यमातून कंपनीचे काम चालते.आपण या कंपनीचा विकास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे अड्.रवींद्र बोरावके यांनी शेवटी सांगितलें आहे.