कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील..या गावाचा पाणी प्रश्न सोडविणार-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील पाणी,रस्ते,वीज आणि आरोग्य या पायाभूत गरजांना विशेष प्राधान्य दिले असून जेऊर कुंभारीचे विकासाच्या इतर प्रश्नांबरोबरच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी दिले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे जेऊर कुंभारी (ग्रामा ४८) राज्य मार्ग १२ ते संजयनगर रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सचिन रोहमारे,आनंदराव चव्हाण,रोहिदास होन,राहुल रोहमारे,सचिन आव्हाड,डॉ.राजेंद्र रोकडे,गोदावरी खोरेचे जनरल मॅनेजर दिलीप शिंदे,गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,महेंद्र वक्ते,पाटीलबा वक्ते,कल्याणराव गुरसळ,कौसर सय्यद,देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे,दौलतराव वक्ते,किरण वक्ते,गणेश निंभोरे,बापूसाहेब वक्ते,जगन्नाथ निंभोरे,शिवाजीराव वक्ते,राजेंद्र पगारे,दिलीप काकडे,राजेंद्र गिरमे,शंकरराव गुरसळ,अनिता गायकवाड,धनश्री वक्ते,किशोर वक्ते,किरण होन,सुनील होन,दौलतराव गुरसळ,पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.